एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona India Update | चिंताजनक... देशात गेल्या सात दिवसात 62 हजार लोकांना कोरोनाची लागण
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. भारतात देखील याचा प्रादुर्भाव वाढतोय. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 36 हजार वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात 1 लाख 14 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.देशातील कुठल्या राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...
नवी दिल्लीः भारतात कोरोना संसर्गाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज कोरोनाबाधितांची संख्या 2,36,657 वर पोहोचली आहे. भारत कोरोनाबाधितांच्या संख्येबाबत जगात सहाव्या स्थानी आला आहे. आतापर्यंत देशात 6,642 लोकांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. मागील सात दिवसात 62 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान देशात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक 294 बळी गेले आहेत. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक 9 हजार 887 रुग्णांची वाढ झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 36 हजार 657 वर पोहोचला आहे. यातील 1 लाख 14 हजार 73 जण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 48.20 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 15 हजार 942 इतके आहेत. गेल्या 24 तासांत 4 हजार 611 रुग्ण बरे झाले आहेत.
मागील सात दिवसात देशात रोज 8 हजारांहून अधिक रुग्ण
- 31 मे- 8380,
- 1 जून - 8392,
- 2 जून - 8171,
- 3 जून - 8909,
- 4 जून - 9304,
- 5 जून - 9851,
- 6 जून - 9887,
एकूण कोरोना रुग्णांपैकी 26.57 टक्के रुग्ण मागील सात दिवसात समोर आले आहेत.
मागील सात दिवसात देशात 1,671 रुग्णांचा मृत्यू
- 31 मे- 193
- 1 जून - 230
- 2 जून - 204
- 3 जून - 217
- 4 जून - 260
- 5 जून - 273
- 6 जून - 294
देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 80229 झाला आहे. त्यातील 35156 बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 2849 जण मृत्यूमुखी पडले आहेत.
महाराष्ट्रात शुक्रवारी ( 05 जून ) 1475 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 35 हजार 156 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. शुक्रवारी कोरोनाचे नवीन 2436 नवे रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य
तामिळनाडू28694 रुग्ण, 15762 बरे झाले, मृतांचा आकडा 232
दिल्ली 26334 रुग्ण, 10315 बरे झाले, मृतांचा आकडा 708
गुजरात 19094 रुग्ण, 13003 बरे झाले, मृतांचा आकडा 1190
राजस्थान 10084 रुग्ण, 7359 बरे झाले, मृतांचा आकडा 218
मध्यप्रदेश 8996 रुग्ण, 5878 बरे झाले, मृतांचा आकडा 384
उत्तरप्रदेश 9733 रुग्ण, 5648 बरे झाले, मृतांचा आकडा 257
पश्चिम बंगाल 7303 रुग्ण, 2912 बरे झाले , मृतांचा आकडा 366
जगभरात कोरोनाचा कहर सुरुच जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 68.44 लाख रुग्ण झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 6,844,705 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 98 हजार वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 3,348,831 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 76 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 14 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 52 लाखांच्या घरात आहे. कोणत्या देशात किती कोरोनाबाधित- अमेरिका: कोरोनाबाधित- 19,65,708 मृत्यू- 111,390
- ब्राझील: कोरोनाबाधित- 646,006 , मृत्यू- 35,047
- रशिया: कोरोनाबाधित- 449,834 , मृत्यू- 5,528
- स्पेन: कोरोनाबाधित- 288,058 , मृत्यू- 27,134
- यूके: कोरोनाबाधित- 283,311, मृत्यू- 40,261
- भारत: कोरोनाबाधित- 236,184 , मृत्यू- 6,649
- इटली: कोरोनाबाधित- 234,531 , मृत्यू- 33,774
- पेरू: कोरोनाबाधित- 187,400 , मृत्यू- 5,162
- जर्मनी: कोरोनाबाधित- 185,414, मृत्यू- 8,763
- टर्की: कोरोनाबाधित- 168,340 , मृत्यू- 4,648
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
पुणे
Advertisement