Corona India Update | देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ, एकूण रुग्णसंख्या 1.65 लाखांवर
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. भारतात देखील याचा प्रादुर्भाव वाढतोय. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 65 हजार 799 वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात 71हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.देशातील कुठल्या राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...
केरळमध्ये 1088 रुग्ण त्यातील 555 बरे झाले झाले आहेत. यातले 7 जण मृत पावले आहेत. केरळचा रिकव्हरी रेट 51.01 टक्के आहे. गेल्या पंधरा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 51 टक्क्यांवर आला आहे.
महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य
तामिळनाडू 19372 रुग्ण, 10548 बरे झाले, मृतांचा आकडा 145 , रिकव्हरी रेट 54.44 टक्के
दिल्ली 16281 रुग्ण, 7495 बरे झाले, मृतांचा आकडा 316, रिकव्हरी रेट 46.03 टक्के
गुजरात 15562 रुग्ण, 8003 बरे झाले, मृतांचा आकडा 960, रिकव्हरी रेट 51.42 टक्के
राजस्थान 8067 रुग्ण, 4817 बरे झाले, मृतांचा आकडा 180, रिकव्हरी रेट 59.71 टक्के
मध्यप्रदेश 7453 रुग्ण, 4050 बरे झाले, मृतांचा आकडा 321, रिकव्हरी रेट 54.34 टक्के
उत्तरप्रदेश 7110 रुग्ण, 4215 बरे झाले, मृतांचा आकडा 194, रिकव्हरी रेट 58.28 टक्के
पश्चिम बंगाल 4536 रुग्ण, 1668 बरे झाले , मृतांचा आकडा 295, रिकव्हरी रेट 36.77 टक्के
जगभरात कोरोनाचे जवळपास 59 लाख रुग्ण जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 59 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये एक लाख 16 हजार नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 24 तासात 4,612 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 5,906,202 लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 61 हजार 549 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 25 लाख 77 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 74 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 43 लाखांच्या घरात आहे. कोणत्या देशात किती कोरोनाबाधित- अमेरिका: कोरोनाबाधित- 1,768,461, मृत्यू- 103,330
- ब्राझील: कोरोनाबाधित- 438,812, मृत्यू- 26,764
- रशिया: कोरोनाबाधित- 379,051, मृत्यू- 4,142
- स्पेन: कोरोनाबाधित- 284,986, मृत्यू- 27,119
- यूके: कोरोनाबाधित- 269,127, मृत्यू- 37,837
- इटली: कोरोनाबाधित- 231,732, मृत्यू- 33,142
- फ्रांस: कोरोनाबाधित- 186,238, मृत्यू- 28,662
- जर्मनी: कोरोनाबाधित- 182,452, मृत्यू- 8,570
- भारत: कोरोनाबाधित- 165,386, मृत्यू- 4,711
- टर्की: कोरोनाबाधित - 160,979, मृत्यू- 4,461