Corona India Update | देशात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 12 हजारांवर, 24 तासात साडेपाच हजारांहून अधिक रुग्ण
कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. भारतात देखील याचा प्रादुर्भाव वाढतोय. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 12 हजार 359 वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात 45 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.देशातील कुठल्या राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...
1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला आजपासून सुरुवात
विविध राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याकेरळमध्ये 666 रुग्ण त्यातील 502 बरे झाले , 4मृत, रिकव्हरी रेट 75.37 टक्के. गेल्या दहा दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढतेय त्यामुळे रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांवर आला आहे.
तामिळनाडू 13191 रुग्ण, 5882 बरे झाले, मृतांचा आकडा 87, रिकव्हरी रेट 44.59 टक्के
गुजरात 12537 रुग्ण, 5219 बरे झाले, मृतांचा आकडा 749, रिकव्हरी रेट 41.62टक्के
दिल्ली 11088 रुग्ण, 5192 बरे झाले, मृतांचा आकडा 176, रिकव्हरी रेट 46.82 टक्के
राजस्थान 6015 रुग्ण, 3403 बरे झाले, मृतांचा आकडा 147, रिकव्हरी रेट 56.57 टक्के
मध्यप्रदेश 5735 रुग्ण, 2733 बरे झाले, मृतांचा आकडा 267, रिकव्हरी रेट 47.65 टक्के
पश्चिम बंगाल 3103 रुग्ण, 1136 बरे झाले , मृतांचा आकडा 253, रिकव्हरी रेट 36.60 टक्के
जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 51 लाखांच्या जवळ
जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे जवळपास 51 लाख रुग्ण झाले आहेत. मागील 24 तासात जगातील 213 देशांमध्ये 99,685 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर कोरोनामुळं 4,738 बळी गेले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 3 लाख 29 हजार 292 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 20 लाख 20 हजार 151 रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 75 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.
जगात कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
- अमेरिका: कोरोनाबाधित- 1,591,953, मृत्यू- 94,992
- रशिया: कोरोनाबाधित- 308,705, मृत्यू- 2,972
- ब्राझील: कोरोनाबाधित- 293,357, मृत्यू- 18,894
- स्पेन: कोरोनाबाधित- 279,524, मृत्यू- 27,888
- यूके: कोरोनाबाधित- 248,293, मृत्यू- 35,704
- इटली: कोरोनाबाधित- 227,364, मृत्यू- 32,330
- फ्रांस: कोरोनाबाधित- 181,575, मृत्यू- 28,132
- जर्मनी: कोरोनाबाधित- 178,531, मृत्यू- 8,270
- टर्की: कोरोनाबाधित- 152,587, मृत्यू- 4,222
- इरान: कोरोनाबाधित - 126,949, मृत्यू- 7,183