कोरोनाचे नमूने नष्ट केल्याचं चीननं केलं मान्य!,अमेरिकेच्या दाव्यावर शिक्कामोर्तब
चीननं सुरुवातीच्या काळातच कोरोना विषाणूचे नमुने नष्ट केल्याचा खुलासा चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य आयोगाचे निरीक्षक यू डेंगफेंग यांनी केला आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनवर कोरोनासंदर्भात माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. आता ट्रम्प यांचा हा दावा खरा होताना दिसत आहे. कारण, चीननं सुरुवातीच्या काळातच कोरोना विषाणूचे नमुने नष्ट केल्याचा खुलासा चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य आयोगाचे निरीक्षक यू डेंगफेंग यांनी केला आहे.
यू डेंगफेंग म्हणाले, हे नमुने चीनमधील जैविक प्रयोगशाळेत नष्ट करण्यात आले. आधी हे नमुने सत्य लपवण्यासाठी नव्हे तर जैविक प्रयोगशाळेच्या सुरक्षेच्या हेतूनं नष्ट करण्यात आले आहे. शिवाय अधिकृतरित्या त्या प्रयोगशाळेत नमुने ठेवता येत नव्हते. त्यामुळे चीनी सार्वजनिक स्वास्थ्य कायद्यांतर्गत नमुने नष्ट करावे लागले.
तर, तिकडे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पॉम्पियो यांनी गेल्या महिन्यातच चीननं कोरोनाचे नमुने नष्ट केल्याचा आरोप केला होता. पॉम्पियो म्हणाले आम्हाला चीनी कम्युनिस्ट पक्षाने देखील जागतिक आरोग्य संघटनेला कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाविषयी वेळेत माहिती दिली नव्हती. प्रत्येक प्रांतात विषाणूचा प्रसार होईपर्यंत चीनने संसर्गाच्या प्रसाराची माहिती लपविली. चीनच्या या कबुलीजबाबमुळे अमेरिकेची शंका आणखीनच वाढेल.
कोरोना व्हायरसविरुद्ध लस विकसित करण्याचं काम वेगानं सुरू आहे. भारत आणि अमेरिका दोन्ही देश ही लस विकसित करण्याचं कार्य करत आहेत. एकमेकांना लागणारी मदत करत असल्याचंही ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं आहे.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडकडून 3100 कोटींचं वाटप करण्यात आलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील स्थलांतरित मजुरांसाठी एक हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर खरेदी आणि लसनिर्मितीसाठी ही रक्कम वापरण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :