एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोना महामारीचा झटका?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या दरम्यान मोदी सरकारने केंद्रात सात वर्षे पूर्ण केली आहेत. मे 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच देशाची सत्ता हाती घेतली. मात्र, सात वर्षे पूर्ण झालेली असताना पंतप्रधान मोदींच्या चेह्यावर ते स्मित, तेज आणि अभिमान दिसत नाही, ज्यासाठी ते नेहमीच ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून देशभरात आलेल्या महामारीची वेदना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीतून स्पष्टपणे दिसत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दीड महिन्यांच्या कालावधीत, रुग्णालये, बेड्स आणि ऑक्सिजनसाठी देशात आकंडतांडव सुरू आहे. देशसह जगभरातील माध्यमं अंत्ययात्रा, स्मशानभूमीची छायाचित्रे आणि व्हिडिओंनी व्यापलेली होती. काही महिन्यांपूर्वी चीनला एलएसीवर धडा शिकवणे, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक, काश्मीरमधून कलम 370 हटविणे, वर्षानुवर्षे रखडलेले राम मंदिर बांधण्यास मान्यता, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि लस-डिप्लोमसीच्या जोरावर जगभर नाव गाजत होतं, ती प्रतिमा पूर्णपणे धूसर होताना दिसत आहे. चीनमधील विषाणूसमोर भारतातील प्रत्येक नागरिक, सरकार आणि यंत्रणा असहाय्य दिसत होती.

1962 च्या युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि संपूर्ण देशासोबत जे झालं तशीच भावना सध्या आहे. जे नेहरू यांना जवळून ओळखतात आणि त्यांचे चरित्र लिहिणारेही त्यांनाही असा विश्वास आहे की नेहरू चीनच्या पराभवानंतर तुटलेले होते. पराभवाचा धक्का आणि चीनच्या मैत्रीतील विश्वासघाताने नेहरू स्तब्ध झाले होते. कोरोना महामारीमध्ये झालेला पराभव पंतप्रधान मोदींना नेहमीच टोचत राहिल का? पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय आणि त्यांच्याबरोबर काम करणारे यांना असा विश्वास आहे की ते पुन्हा 'फिनिक्स'सारखे उभे राहतील. यापूर्वी असे बर्‍याच वेळा घडले आहे. पीएम मोदी केवळ उभेच राहत नाही तर आकाशात झेपही घेतात.

1962 च्या युद्धापूर्वी भारत आणि पंतप्रधान नेहरूंचा देशासह जगभरात डंका वाजत होता. स्वातंत्र्यानंतर लगेचच नेहरूंनी देशात औद्योगिकीकरणाला वेग दिला. देशात 'लोकशाहीची नवीन मंदिरे' बांधली जात होती. देशात आयआयटी आणि मोठमोठे हॉस्पिटल्स आणि जागतिक दर्जाच्या तांत्रिक संस्था स्थापन केल्या जात होत्या. शेजारील देश पाकिस्तानसह आशिया आणि आफ्रिका या नव्या देशांतील सैन्य सत्ता पालट करत होते. तेव्हा नेहरूंनी जगातील सर्वात मोठी लोकशाही उभी केली. 1947 ते 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नेहरूंचा लोकप्रियता आलेख खूपच जास्त होता. 1962 मध्ये झालेल्या (फेब्रुवारीमध्ये) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नेहरूंच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाला 494 पैकी 361 जागा मिळाल्या होत्या. तथापि, 1957 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसला 10 जागा कमी मिळाल्या.

50 आणि 60 च्या दशकात, जेव्हा जग दोन गटांमध्ये विभागून अमेरिका आणि रशियाच्या मागे जात होते, तेव्हा नेहरूंनी निपक्षपणे उभे राहत तिसर्‍या जगाला जन्म देण्यास महत्वाची भूमिका बजावली होती. जागतिक पातळीवर नेहरूंची लोकप्रियता त्यांच्या समकालीन राजकारणी, ईसानहॉवर, कॅनेडी, निकिता ख्रुश्चेव्ह, टिटो, सुर्कणो, नासिर आणि माओ यांच्या तुलनेत जास्त होती आणि कदाचित याच कारणास्तव नेहरूंच्या विरोधात कट रचण्यास सुरुवात केली. असे मानले जाते की 62 च्या युद्धामध्ये चीनला भारताचा पराभव करायचा नव्हता. परंतु, नेहरूंना आशियातील सर्वात मोठा जागतिक नेता होऊ देणार नाही, यासाठी हा खटाटोप होता.

1962 मध्ये नेहरूंना जागतिक पातळीवर शत्रू होते. पण देशांतर्गत आघाडीवर कोणीही नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असे सांगितलं जातं की जेव्हा नेहरू संसदेत भाषण करण्यास उभे राहत होते, तेव्हा विरोधी पक्षनेतेही आवाज करण्याची हिम्मत करत नव्हते. नेहरुंना प्रत्येकजण खूप काळजीपूर्वक ऐकत होता. काही लोकांचा असा दावा आहे की हेच कारण आहे की सरकार किंवा विरोधी पक्षांनी चीनवरील नेहरूंच्या धोरणाबद्दल फारसे प्रश्न उपस्थित केले नाहीत. ज्याचा परिणाम चीनकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. याउलट, जर आजच्या परिस्थितीत मोदींकडे पाहिले तर त्यांच्या जागतिक स्तराच्या प्रतिमेविरूद्ध इतर देश आहेतच. सोबतच देशातील विरोधी पक्ष, मीडिया, स्वयंसेवी संस्था आणि विचारवंतही त्यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. पण पंतप्रधान मोदी प्रत्येकवेळी त्यांना धोबीपछाड देत आहेत.

पण गेल्या दीड महिन्यांत सर्व काही बदलले आहे. यावेळी मागे पडण्याची अनेक मोठी कारणे आहेत. कोरोना महामारीत आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी मोदी यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर मानलं जात होतं. मग चुकलं कुठं? कोरोनाची दुसरी लाट आधीच अमेरिका, ब्रिटन, दक्षिण कोरिया, इटली आणि फ्रान्समध्ये आली होती. मग भारताने दुसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी का केली नाही? ऑक्सिजन प्लांट वेळेवर का स्थापित केले नाहीत? पहिल्या लाटे दरम्यान तयार केलेली अतिरिक्त रुग्णालये का बंद केली गेली? इतर देशांच्या दुसर्‍या लाटेतून भारत का शिकला नाही? रुग्णालयांमध्ये बेडची संख्या का वाढवली नाही? पहिल्या लाटेदरम्यान पंतप्रधानांनी लॉकडाउन, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण देश मोठ्या संकटातून वाचला होता.

हे स्पष्ट आहे की येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या आणि देशाची सत्ता पुन्हा आपल्या हातात घेतली. अलीकडेच एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की कोरोना साथीच्या काळात पंतप्रधानांच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. मात्र, तरीही 62 टक्के जनता मोदी यांच्या कामावर समाधानी आहे. पण पंतप्रधानांची सर्वशक्तिमान आणि जागतिक नेत्याची प्रतिमा डागळली गेली आहे. जे पंतप्रधान, त्यांचे सरकार, पक्ष, कार्यकर्ते, आयटी सेल आणि भक्तांना जड जाणार आहे.

(टीप - या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची व्यक्तिगत मते आहेत, ती एबीपी माझाची मते नाहीत)

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse Deepak Kesarkar on Raut : जी काही राहिली आहे ती संभाळा, भुसे-केसरकरांनी राऊतांना सुनावलंTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaPriyanka Chaturvedi On Eknath Shinde : तंत्र-मंत्र आणि अमावस्येची रात्र, एकनाथ शिंदेंबाबत प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Embed widget