नवी दिल्ली : रशियामध्ये जगभरातील पहिल्या कोरोना वॅक्सिनला मंजूरी देण्यात आली आहे. आता हे वॅक्सिन इतर देशांसाठी उपलब्ध करणं आमि त्याचं उत्पादन करणं यासंद्रभात चर्चा सुरु झाल्या आहेत. जगभरातील पहिल्या कोरोना वॅक्सिनचा दर्जा मिळालेल्या या रशियाच्या वॅक्सिनचं नाव 'स्पुतनिक V' (Sputnik V) असं ठेवण्यात आलं आहे. गामालेया नॅशनल सेंटरने कोरोनाची लस स्पुतनिक V तयार केली आहे. गामालेया सेंटरच्या व्यतिरिक्त रुसच्या एका मोठ्या बिजनेस ग्रुप सिस्टोमाला वॅक्सिनच्या प्रोडक्शनची जबाबदारी दिली आहे.


सिस्टेमा ग्रुपचं म्हणणं आहे की, एका वर्षात वॅक्सिनच्या 15 लाख डोस तयार करण्याचं त्यांचं लक्ष्य आहे. वॅक्सिनची मोठी मागणी आणि रशिया फार्मा कंपन्यांची मर्यादीत क्षमता पाहता. इतर देशांच्या लोकांपर्यंत रशियन वॅक्सिन पोहचण्यासाठी बराच अवधी लागू शकतो. अशातच रशियाने वॅक्सिन तायर केल्याची घोषणा करता, कदाचितच कोणत्या देशाने रशियन वॅक्सिन खरेदी करण्याची इच्छा दर्शवली असेल. परंतु, रॉयटर्सने दिलेल्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, इतर देशांनी रशियन वॅक्सिनच्या 100 कोटी डोसची मागणी केली आहे.'


पाहा व्हिडीओ : कोरोना झाला की नाही हे आता आवाजावरुन समजणार?



भारतात केव्हा आणि कशी पोहोचणार रशियन वॅक्सिन?


भारतीय बाजारात कोणत्याही दुसऱ्या देशातील वॅक्सिन आणण्याआधी त्याची फेज - 2 आणि फेज -3 चा क्लिनिकल ट्रायल होणं गरजेचं आहे. परीक्षण सफल झाल्यानंतरच या वॅक्सिनला हिरवा कंदील दाखवण्यात येईल. हिच प्रक्रीया इतर देशांच्या वॅक्सिनबाबत वारण्यात येईल.


देशातील सर्वात मोठ रुग्णालय एम्सचे निर्देशक डॉ. रणदीप गुलेरिया यांचं म्हणणं आहे की, जगभरातील तिसऱ्या सर्वात जास्त प्रभावित देश असलेल्या भारतातही हे वॅक्सिन उपलब्ध करण्या अगोदर ते सुरक्षित आहे का? याची तपासणी करण्यात येईल. जर रशियाचं वॅक्सिन सर्व ट्रायलमध्ये यशस्वी झालं. तर ते उपलब्ध करण्याच येईल. तसेय या वॅक्सिनचे साइड इफेक्ट आणि सुरक्षा यांविषयी बारकाईने तपासण्या करण्यात येतील. डॉ. गुलेरिया यांचं म्हणणं आहे की, जर हे वॅक्सिन सुरक्षित असेल तर भारताकडे मोठ्या प्रमाणावर याची निर्मिती करण्याची क्षमता आहे.


ऑक्सफोर्ड वॅक्सिनच्या ट्रायलला मिळाली मंजूरी


भारतात आता ऑक्सफर्ड युनिवर्सिटीच्या वॅक्सिनच्या ट्रायलला मंजूरी देण्यात आली आहे. डीसीजीआय म्हणजेच, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया, पुणे ला भारतात ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी - एक्स्ट्रा जेनेका कोविड-19 वॅक्सिन कोवीशइल्ड (COVISHIELD)च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ह्युमन क्लिनिकल ट्रायलची परवानगी देण्यात आली आहे.


लवकरच ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे आपल्या ट्रायलची सुरुवात करणार आहेत. यासाठी लवकरच सर्व तयारी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये इंस्टिट्यूटची निवड, वॉलेंटियर्सची निवड इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.


महत्त्वाच्या बातम्या :