नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन यादेशांसोबतच भारतातही कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतात कोरोना वॅक्सिनवर ट्रायल सुरु आहेत. देशात हैदराबादमधील भारत बायोटेक आणि अहमदाबाद येथील जायडस कॅडिला कंपनीने लसीचं ह्युमन ट्रायल सुरु केलं आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरलने या वॅक्सिनच्या ह्युमन ट्रायलला मंजुरी दिली आहे.
भारताची पहिली कोरोनावरील लस
भारताची पहिली संभाव्य लस कोवॅक्सिनचं ह्युमन क्लिनिकल ट्रायल दिल्ली, पाटणा, भुवनेश्वर, चंदिगढसह 12 विभागांमध्ये सुरु आहे. कोवॅक्सिन या लसीची निर्मिती भारत बायोटेक, आयसीएमआर आणि नॅशनल इस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयवी) यांनी एकत्र येऊन केली आहे. या लसीची निर्मिती हैदराबाद येथील कारखान्यात करण्यात येणार आहे.
Corona Vccine | 'या' भारतीय कंपनीचा कोरोना लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी
Zydus Cadila येथे क्लिनिकल ट्रायलचा दुसरा टप्पा सुरु
भारतीय औषध कंपनी जायडस कॅडिलाने प्लाज्मिड डीएनए वॅक्सिन 'जायकोवी-डी'चं 6 ऑगस्टपासून दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु केलं आहे. पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरक्षित आणि यशस्वी झाल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, पहिल्या टप्प्यात क्लिनिकल परीक्षणात वॅक्सिनचा डोस देण्यात आलेले वॉलेंटिअर्सची तब्बेत उत्तम आढळून आली. पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल 15 जुलै पासून सुरु करण्यात आलं होतं.
भारतीय औषध कंपनी अरविंदो फार्मा
हैदराबादमधील भारतीय औषध कंपनी अरविंदो फार्माही कोरोनावरील लस शोधत आहे. यासाठी कंपनीला जैव प्रौद्योगिक विभागाकडून आर्थिक सहाय्यही करण्यात आलं आहे. कंपनी न्यूमोकोकल कंजुगेट वॅक्सीन (पीसीवी) विकसित करत आहेत. कंपनीने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील संशोधन यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल डिसेंबर 2020 पर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. अरविंदो फार्माने सांगितल्यानुसार, वॅक्सिन 2021-22 च्या अखेरपर्यंत लस बाजारात येण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला विश्वास आहे की, यावर्षी वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना वॅक्सिन तयार केलं जाईल. सीरम इंस्टीट्यूट एस्ट्रजेनेका ऑक्सफोर्ड वॅक्सीनवर काम करत आहे. ज्याचा तिसरा टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. याच भारतात ऑगस्टमध्ये ह्युमन ट्रायल सुरु होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- गूड न्यूज...! कोरोनावरील जगातील पहिली लस बनवल्याचा रशियाचा दावा; अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची घोषणा
- सीरम इन्स्टिट्यूटची कोविड लस फक्त 225 रुपयांत मिळणार; गेट्स फाउंडेशनचा पुढाकार
- कोरोनावरील लस येण्यासाठी अजून किमान सहा महिने लागतील : अदर पुनावाला
- कोरोना प्रतिबंधक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून स्पेशल टास्क फोर्स