नवी दिल्ली : संपूर्ण जगासाठी आनंदाची बातमी आहे. संपूर्ण जग जीवघेण्या कोरोना व्हायरससोबत लढत असताना, एक आशेचा किरण दिसला आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी मंगळवारी घोषणा केली आहे की, 'रशियाने कोरोना व्हायरसवर प्रभावी अशी जगातील पहिली लस तयार केली आहे.' तसेच पुतीन यांनी दावा केला आहे की, 'ही लस जगातील पहिली यशस्वी कोरोना व्हायरसवरील वॅक्सिन असून याला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने मंजूरी दिली आहे.' एवढचं नाहीतर पुतीन यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीलाही या लसीचा डोस देण्यात आला आहे.


AFP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे वॅक्सिन मॉस्को येथील गामेल्या इंस्टीट्यूटने डेव्हलप केलं आहे. मंगळवारी रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने वॅक्सीम यशस्वी असल्याचं सांगितलं आहे. याचसोबत व्लादिमिर पुतीन यांनी घोषणा केली की, रशिया लवकरच या वॅक्सिनचं प्रोडक्शन सुरु करणार आहे. मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनचे डोस तयार केले जाणार आहेत.


व्लादिमिर पुतीन यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिलाही या वॅक्सिनचा डोस देण्यात आला होता. काही वेळासाठी तिला ताप आला होता. परंतु, त्यानंतर तिची प्रकृती स्थिर आहे.'


दरम्यान, जगभरात कोरोनावर यशस्वी लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्या लसींचं क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार, 100 हून अधिक वॅक्सिन तयार करण्याचं काम सुरु आहे. ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, इज्राइल, चीन, रशिया, भारत यांसारख्या देशांचा समावेश आहे. भारतात कोरोना व्हायरस वॅक्सिनचं ह्युमन ट्रायल सुरु आहे. हे वॅक्सिन सध्या दुसऱ्या स्टेजमध्ये आहे.


आता जर रशियाच्या वतीने करण्यात आलेली घोषणा खरी ठरली आणि WHO कडून या वॅक्सिनला मंजूरी मिळाली. तर जगभरातील सर्व लोकांसाठी खरचं आनंदाची बाब आहे.


जर रशियातील कोरोना स्थितीबाबत बोलायचे झाले तर, येथे जवळपास नऊ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. रशियात पंधरा हजारांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तसेच सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आलेल्या देशांमध्येही रशियाचा समावेश झाला आहे. रशियाचे पंतप्रधान पुतीन यांच्यासोबतच कॅबिनेटमधील इतर लोकांनाही कोरोनाची लागण झाली होती.


महत्त्वाच्या बातम्या :