Corona Vaccine : कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीच्या 'मिक्स डोस'च्या अभ्यासाला DGCI ची मंजुरी
कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या मिक्स डोसचा परिणाम अधिक चांगला येत असून त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली होते असं ICMR ने स्पष्ट केलं आहे.

नवी दिल्ली : कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींच्या मिक्स डोसच्या परिणामाचा अभ्यास करण्यास ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ( DGCI) मंजुरी दिली आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या मिक्स डोसचा परिणाम अधिक चांगला येत असून त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली होते असं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) ताज्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता यावर अभ्यास करण्यास डीजीसीआयने मंजुरी दिल्याचं समजतंय.
या आधी चुकून दोन लसीचे वेगवेगळे डोस घेतलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालं होतं. पण आयसीएमआरच्या अभ्यासानुसार असे मिक्स डोस अधिक परिणामकारक असल्याचं स्पष्ट झाल्यानं त्यांना दिलासा मिळाला आहे.
दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेऊ नका असं या आधी सरकारकडून आवाहन करण्यात आलं होतं. आता ICMR च्या ताज्या अभ्यासानुसार, या दोन लसींचे 'मिक्सिंग अॅन्ड मॅचिंग' अधिक चांगला परिणाम दाखवतात असं सांगण्यात येत आहे.
महत्वाचं म्हणजे दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेणं हे अधिक सुरक्षित असल्याचंही आयसीएमआरने आपल्या या अभ्यासात सांगितलं आहे. या आधी देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये लसीचा तूटवडा निर्माण झाला असताना उपलब्ध असलेल्या दुसऱ्या कंपनीची लस घेता येईल का अशी चाचपणी सुरु होती. पण त्यावेळी दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेऊ नका, त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता असते असं सरकारकडून आवाहन करण्यात आलं होतं.
पहा व्हिडीओ : Covishield आणि Covaxin च्या Mix Dose वर अभ्यास करण्यास DGCI ची मंजुरी, मिस्क डोस परिणामकारक : ICMR
महत्वाच्या बातम्या :























