एक्स्प्लोर

Corona Vaccination | आता घरोघरी जाऊन लसीकरणाची तयारी? अनेक कंपन्यांचा केंद्र सरकारला प्रस्ताव

देशातील बर्‍याच कंपन्यांनी डोअर स्टेप (घरोघरी जाऊन) लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे संपर्क साधला आहे. पुढील काही दिवसांत याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर बनत आहे. लसीकरण हा कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय दिसत आहे. मात्र लसीकरणाचा वेग वाढवायचा तर लसी तितक्या प्रमाणात उपलब्ध नाहीयेत. मात्र  देशात स्पुटनिक V लसीच्या वापराला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याने लसीकरणाच वेग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा विचार केला जात आहे.

देशातील बर्‍याच कंपन्यांनी डोअर स्टेप (घरोघरी जाऊन) लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे संपर्क साधला आहे. पुढील काही दिवसांत याबाबत निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. कोरोनाचा प्रसार देशात वेगाने सुरू आहे.  त्यासोबतच आतापर्यंत 10 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. स्पुटनिक V लसीच्या मंजुरीने आता लोकांना लस देण्यासाठी घरोघरी जाण्याचा विचार होत आहे.

Coronavirus | आळशी लोकांना कोरोनाचा धोका अधिक, संशोधनातून माहिती उघड

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत देशातील मोठ्या लोकसंख्येला लस देण्याची सरकारची योजना आहे. यासाठी 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना लस देण्याची योजना आखली जात आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या योजनेला परवानगी मिळताच लोकांना घरोघरी जाऊन लस देण्यासही मंजुरी मिळू शकते. 

लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतला ऑक्सिजन घेऊन रुग्णालयांना पुरवणार, राजेश टोपेंची माहिती

लसीकरणासाठी प्रति व्यक्ती 25 ते 37 रुपये आकारण्याचा प्रस्ताव

अनेक फार्मा कंपन्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव दिला आहे, ज्यामध्ये या कंपन्यांनी लोकांच्या घरी जाऊन लसीकरणाचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र यासाठी या कंपन्यांनी प्रति व्यक्ती 25 ते 37 रुपये आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणत्याही कंपनीला परवानगी मिळाली नाही. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जर लोकांना घरी जाऊन लस देण्याची व्यवस्था केली गेली तर सुरुवातीच्या टप्प्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालय केवळ आपल्या सरकारी नेटवर्कचा वापर करेल. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की,  येत्या काही महिन्यांत देशातील प्रौढ जनतेचं लसीकरण पूर्ण होईल. येत्या काही महिन्यांत लवकरच आणखी काही लसींना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार अन्य वयोगटातील लोकांना लस देण्यास  लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Mutton Shops Dhulivandan 2025 : नागपुरात धुळवडीनिमित्त मटनाच्या दुकानांत मोठ्या रांगाABP Majha Headlines : 10 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
Mumbai Mutton Shop queue: धुळवडीला मटणाचा बेत, दुकानांबाहेर लागल्या रांगा, तीन तास वेटिंग
धुळवडीमुळे मटणाचा भाव वधारला, 880 रुपयांचा टप्पा ओलांडला, दुकानांबाहेर भल्यामोठ्या रांगा
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
Embed widget