Corona Second Wave: येत्या 15-20 दिवसात देशात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
देशात कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून येत्या 15 ते 20 दिवसात कोरोनाच्या प्रसाराचा वेग मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
![Corona Second Wave: येत्या 15-20 दिवसात देशात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता corona updates Corona Second Wave in India may peak in 15 to 20 days Corona Second Wave: येत्या 15-20 दिवसात देशात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/31/db8311790a259ec1c63451ed4243ad81_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या संक्रमणाचा वेग सातत्याने वाढत असून गेल्या देशात गेल्या चोवीस तासात 81,466 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात येत्या 15 ते 20 दिवसात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही निरीक्षणं नोंद केली आहेत. त्यात वरील चिंता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही येत्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्याचं मतही मनिंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केलं आहे.
मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं की, येत्या 15 ते 20 दिवसात रोज 80 हजार ते 90 हजार कोरोना रुग्णांची भर पडणार आहे. ही आकडेवारी यापेक्षाही जास्त असू शकते. नंतर काही दिवसांनी यात घसरण होण्याची शक्यता आहे.
गेल्या सहा महिन्यानंतर (182 दिवस) कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक नोंदवला आहे. देशात गेल्या चोवीस तासात 81,466 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या चोवीस तासात 50,356 रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात गुरुवारी एकाच दिवशी 43 हजारांच्या वर कोरोना रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाचं संकट वाढल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आज 11 सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत केंद्रीय कॅबिनेट सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत.
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्येमध्ये वाढ होत आहे. गुरुवारी मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या तब्बल साडे आठ हजारांच्या आसपास होती. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी लोकल सेवेवर निर्बंध आणावे लागतील अशा पद्धतीचे संकेत दिलेले आहेत.
देशभरात गुरुवारपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाचे रुग्णांची रोज चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आणि खाजगी लसीकरण केंद्रांवर एप्रिल महिन्यामध्ये राजपत्रित सुट्टीसह सर्व सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sachin Tendulkar Hospitalized : सचिन तेंडुलकर उपचारासाठी रुग्णालयात दाखल, काही दिवसांपूर्वी झाले होते कोरोनाचे निदान
- Maharashtra Lockdown Updated: महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता
- राज्यात सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा! रक्तदान करण्याचे जितेंद्र आव्हाडांचे आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)