एक्स्प्लोर

Corona Update : देशात 102 दिवसांनी 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद; गेल्या 24 तासांत 907 रुग्णांचा मृत्यू

देशात गेल्या 24 तासांत गेल्या 24 तासांत 37,566 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 907 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट 96.87% वर पोहोचला आहे. 

Corona Update India : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. तसेच देशातील लसीकरण मोहीमेलाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 37,566 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 907 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 102 दिवसांनी देशात चाळीस हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल दिवसभरात 56,994 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. याचसोबतच देशाचा रिकव्हरी रेट 96.87% वर पोहोचला आहे. 

देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होऊन  5,52,659 पोहोचली आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 3,97,637 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढून 96.87% टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, सोमवारी 46,148 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 979 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच रविवारी देशात 52 लाख 76 हजार लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 

देशातील आजची कोरोना स्थिती

  • एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 3 लाख 16  हजार 897 
  • कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी  93 लाख 66 हजार 601
  • एकूण सक्रिय रुग्ण :  5 लाख 52 हजार 659
  • एकूण मृत्यू :  3 लाख 97 हजार 637

राज्यात सोमवारी 6727 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, वर्ध्यात रुग्णसंख्या शुन्यावर

राज्यात मागील दोन दिवस कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी वाढली होती. मात्र काल (सोमवारी) राज्यात कालच्या तुलनेत रुग्णसंख्या तीन हजारने कमी झाली आहे. राज्यात काल 6727 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 812 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 58 लाख 925 रुणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.99 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 864 अॅक्टिव रुग्ण आहेत. 

राज्यात काल 101 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढाआहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,12,08,361 प्रयोगशाळानमुन्यांपैकी 60,43,548 (14.65 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,15,836 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4,245 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांपैकी यवतमाळमध्ये सर्वात कमी 86 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 17 हजार 42 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 35 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात एकही मृत्यूची नोंद नाही. तर वर्धा जिल्हात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.

एकूण 11 जिल्ह्यातील रुग्णसंख्या 10 च्या खाली

  • वर्धा - 0
  • भंडारा - 1
  • गोंदिया - 4
  • चंद्रपूर - 7
  • वाशिम - 7
  • यवतमाळ - 8
  • अकोला -8 
  • नांदेड - 5
  • हिंगोली - 8 
  • नंदूरबार - 5
  • धुळे - 5 

मुंबई काल 608 रुग्णांची नोंद, तर 18 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत गेल्या 24 तासात 608 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 94 हजार 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8453 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 728 दिवसांवर गेला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget