एक्स्प्लोर

Corona Update India : देशात सक्रिय रुग्णसंख्येत कमालीची घट; गेल्या 24 तासांत 70,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Corona Update India : भारतातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असून मृतांचा आकडा मात्र वाढताच आहे. गेल्या 24 तासांत 70,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 3921 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

Corona Update India : देशात सलग सातव्या दिवशी एक लाखाहून कमी दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांहून कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 70,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3921 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 19 हजार 501 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी 30 मार्च रोजी सर्वात कमी म्हणजेच, 53,480 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. 

देशातील आजची कोरोना स्थिती

एकूण कोरोना रुग्ण : दोन कोटी 95 लाख 10 हजार 410 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 81 लाख 62 हजार 947 
एकूण सक्रिय रुग्ण : 9 लाख 73 हजार 158
एकूण मृत्यू : 3 लाख 74 हजार 305

देशात सलग 32व्या दिवशी कोरोना व्हायरसचे नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. 13 जनपर्यंत देशभरात 25 कोटी 48 लाख कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 14 लाख 99 हजार लसीचे डोसे देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत जवळपास 38 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 14.92 लाख कोरोना सॅम्पल्सची चाचणी करण्यात आली आहे. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 4 टक्क्यांहून अधिक आहे. 

रविवारी राज्यात 10,442 नवे रुग्ण तर 7,504 रुग्णांना डिस्चार्ज, 15 जिल्हे आणि शहरात एकही मृत्यू नाही

राज्यात काल 10,442 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 7,504 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 483 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात आली आहे. राज्यात काल एकूण 1,55,588 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

आजपर्यंत एकूण 56,39,271 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.48% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 483 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,80,46,590 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,08,992 (15.53 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 9,62,134 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,160 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Superfast News : विधानसभा निवडणुकांच्या प्रत्येक बातम्या एका क्लिकवर : 18 October 2024Zero Hour : अमित ठाकरेंसाठी ठाकरे बंधू मुलांसाठी ॲडजस्टमेंट करणार ?Zero Hour : राऊतांच्या वक्तव्यावर नानांचा पलटवार; हा संघर्ष तर जुनाचZero Hour : विधानसभा निवडणुकीसाठी 12 - 13 सभा घेणार पंतप्रधान मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
महायुतीचा जागावाटपाचा अंतिम निर्णय आज होणार? फडणवीसांसह अजित पवार दिल्लीत दाखल, अमित शाहंसोबत होणार बैठक
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
मुंबईतील मध्य रेल्वेलाईनवर लोकल रुळावरुन घसरली; वाहतूक खोळंबली
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
Embed widget