Corona Update | बंगळुरु येथील 27 वर्षीय महिलेला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
जुलैमध्ये या महिलेमध्ये ताप आणि खोकल्याची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर कोविड 19 ची टेस्ट केल्यानंतर ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती.
बंगळुरु : देशात कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जगभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत भारत ब्राझिलच्या पुढे गेला असून आता दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या 24 तासाता भारतात 90 हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे स्थिती अधित चिंताजनक बनली आहे. त्यात आणखी चिंता वाढवणारी बाब म्हणजे बंगळुरु कोरोना झालेल्या महिलेला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या 27 वर्षीय महिलेल्या पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेया जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी कोरोनावर मात करुन ही महिला ठिक झाली होती. जुलैमध्ये या महिलेमध्ये ताप आणि खोकल्याची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर कोविड 19 ची टेस्ट केल्यानंतर ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती.
उपचारानंतर महिला कोरोनामुक्त झाली होती. मात्र आता पुन्हा या महिलेमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत होते, त्यानंतर तिची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांच्या माहितीनुसार अशाप्रकारची ही देशातील पहिली केस असावी.
फोर्टिस हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग विभागातील सहायक डॉ. प्रतीक पाटील यांनी सांगितलं की, "जुलैच्या पहिल्या आठवड्यात महिलेला कोरोनाची लक्षणे दिसली. यानंतर कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. उपचारानंतर पुन्हा चाचणी घेतल्यानंतर कोविड टेस्ट निगेटिव्ह आली होती. 24 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं होतं. एका महिन्यानंतर, ऑगस्टच्या शेवटी त्यांच्यात पुन्हा सौम्य लक्षणे दिसून आली. टेस्ट केल्यानंतर त्यांची कोविड टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आली. दोन्ही वेळेस त्यांच्यात सौम्य लक्षणे होती. दोनदा कोरोनाची लागण होण्याची बंगळुरुमधील ही पहिलीच घटना असावी.''