एक्स्प्लोर

येत्या 10 दिवसांत काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार?

येत्या दहा दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाला राहुल गांधींच्या ऐवजी नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असून ते आपला निर्णय मागे घेण्याची सुतराम शक्यता नाही.

नवी दिल्ली : येत्या दहा दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाला राहुल गांधींच्या ऐवजी नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असून ते आपला निर्णय मागे घेण्याची सुतराम शक्यता नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय पक्षाचा नवा अध्यक्ष हा गांधी घराण्यातला नको, गांधी घराण्याबाहेरचे नाव सुचवा असेही राहुल गांधींनी म्हटले आहे. त्यामुळे आता नवा काँग्रेस अध्यक्ष कोण असणार? याची चर्चा सुरु झाली आहे. काल झालेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतल्या पराभवावरुन जोरदार मंथन झाले. त्यात राहुल गांधींनी दिलेला राजीनामा कार्यकारिणीने नाकारला. राहुल यांना पक्षाची पुर्नरचना करण्याचे सर्वाधिकारही देण्यात आले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षाची नवी रचना कशी असणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान एकाच वेळी काँग्रेसचे चार कार्यकारी अध्यक्ष नेमले जाणार असल्याचीही चर्चा रंगत आहे. परंतु या चार कार्यकारी अध्यक्षांमध्येही प्रियंका गांधी यांचे नाव नसणार हे निश्चित आहे. कारण घराणेशाहीच्या आरोपातून काँग्रेसला मुक्त करण्यासाठीच राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे 2019 च्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहा काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधींच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास दाखवला असला तरी त्यांच्या ऑफिसच्या कार्यशैलीबाबत मात्र काहींनी नाराजी व्यक्त केली. निखिल अल्वा, के. राजू, संदीप सिंह यांच्यासारखे राहुल यांचे अनेक सहकारी हे डाव्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे पक्षाची दिशा चुकत असल्याचा अनेकांचा आरोप होता. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या या बैठकीत जे लोक चिंतनासाठी बसले होते, त्यापैकी अनेकांना पराभवाचा झटका बसला आहे. राहुल गांधी स्वतः अमेठीतून हरले आहेत. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गेदेखील हरले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, आरपीएन सिंह, सुषमासिंह देव हे सर्व काँग्रेसचे बडे नेतेदेखील पराभूत झाले आहेत. त्यामुळे सीडब्लूसीत कोण कोणाकडे बोट दाखवणार हा प्रश्न होताच. आता या मंथनातून काँग्रेस पक्ष खरंच काही क्रांतिकारी बदल करणार का? की पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच पाहायला मिळणार, हे लवकरच कळेल. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावर राहुल गांधींचा राग | नवी दिल्ली | एबीपी माझा दरम्यान, निवडणुकीतील पराभवानंतर गांधी कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने राजीनामा सादर करायचा, आणि त्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीने तो नाकारायचा, असे नाट्य याहीआधी घडलेले आहे. त्यामुळे आज त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. सलग दोन मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस पक्ष आता स्वतःच्या कार्यशैलीबद्दल गांभीर्याने विचार करणार का? नव्या पुनर्ररचनेत राहुल गांधी काही धाडसी निर्णय घेणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप

व्हिडीओ

Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

Embed widget