एक्स्प्लोर
लोकसभेसाठी सर्व राज्यांमध्ये विविध पक्षांसोबत युती करणार : चिदंबरम
माजी वित्त मंत्री पी. चिदंबरम यांनी आज पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, येणाऱ्या निवडणुंकांमध्ये काँग्रेस सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांसोबत युती करणार आहे.
इंदूर : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचा काय फॉर्म्युला असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी वित्त मंत्री पी. चिदंबरम यांनी आज पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. चिदंबरम म्हणाले की, येणाऱ्या निवडणुंकांमध्ये काँग्रेस सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांसोबत युती करणार आहे.
सध्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधल्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचारासाठी चिदंबरम आज इंदूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते म्हणाले की, विविध राज्यांमध्ये काँग्रेसची युती होईल. त्यामुळे आम्हाला आगामी निवडणुका जिंकणे सोपे जाईल.
2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने आता कंबर कसली आहे. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या मदतीने काँग्रेस मैदानात उतरणार आहे. परंतु सध्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने कोणत्याही पक्षासोबत युती केलेली नाही. तेलंगणामध्ये काँग्रेसने प्रदेशिक पक्ष टीडीपीसोबत युती केलेली आहे. तसेच अनेक लहानमोठ्या पक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
आरएसएसवर बंधने लादणार
चिदंबरम म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही नाकारले तरी सर्वांना माहीत आहे की, आरएसएस एक राजकीय संस्था आहे. जर आम्ही सत्तेत आलो तर आरएसएसवर बंधने लादू. सरकारी कर्मचाऱ्यांना संघात प्रवेश करण्यापासून रोखू.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement