एक्स्प्लोर
दिल्लीच्या प्रदूषणावर राहुल गांधींचं शायरीतून भाष्य
मागील आठवड्यापासून दिल्लीत धुरक्याची चादर पसरली आहे. यानंतर प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आणि सरकारच्या अपयशाबाबत चर्चा सुरु झाली आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शायरीचा आधार घेत भाष्य केलं आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील भीषण प्रदूषणाबाबत सरकारच्या मौनावर काँग्रेस उपाध्यक्षांनी शायरीतून प्रश्न उपस्थित केला आहे.
"सीने में जलन, आँखों में तूफ़ान सा क्यों है, इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है? क्या बताएँगे साहेब, सब जानकर अंजान क्यों हैं?," असं ट्वीट राहुल गांधी यांनी आपल्या अकाऊंटवरुन केलं आहे. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ सिनेमाच्या गाण्यातील ह्या ओळी आहेत.
https://twitter.com/OfficeOfRG/status/929976317226860544
मागील आठवड्यापासून दिल्लीत धुरक्याची चादर पसरली आहे. यानंतर प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आणि सरकारच्या अपयशाबाबत चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, दिल्ली सरकार आणि प्रदूषण नियंत्रण संस्था धुरक्याला आळा घातल्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु केंद्र सरकारने अद्याप याबाबत कोणतंही पाऊल उचललेलं नाही.
वाढत्या वायु प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा-कॉलेजं आठवडाभरापासून बंद आहेत. तर ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने परिस्थिती पाहून शहरात 'मेडिकल आपत्कालीन परिस्थिती'ची घोषणा केली आहे. नागरिकांना श्वसनासंबंधित त्रास होत आहेत. तर काहींनी डोळ्यांची जळजळ आणि खोकल्याची तक्रार केली आहे.
दुसरीकडे, प्रदूषणाची गंभीर समस्या पाहता सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर सुनावणीसाठी तयार झालं आहे. या प्रकरणात आता उशिर करुन चालाणार नाही, असं सांगत सुप्रीम कोर्टाने सुनावणीला सहमती दर्शवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement