Sonia Gandhi health update : सोनिया गांधींना कोरोनापाठोपाठ फंगल इन्फेक्शन, प्रकृतीवर डॉक्टरांची 24 तास नजर!
Sonia Gandhi Health Update : सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसकडून (Congress) अपडेट देण्यात आली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली.
Sonia Gandhi Health Update : सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत काँग्रेसकडून (Congress) अपडेट देण्यात आली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. 12 जून रोजी सोनिया गांधी यांच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरु झाला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनिया गांधी (Sonia Gandhi) सध्या रुग्णालयातच उपचार घेत आहेत. गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक सोनिया गांधी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी सोशल मीडियाद्वारे सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. 12 जून रोजी त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरु झाला. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोनिया गांधी यांना फंगल इन्फेक्शन झालेय, त्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. कोरोनानंतर होणाऱ्या आजाराचा आणि फंगल इन्फेक्शनचा उपचार सुरु आहेत. दरम्यान, सोनिया गांधी यांना दोन जून रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती. दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी याआधी राहुल गांधी यांची ईडीने सलग तीन दिवस चौकशी झाली आहे. ईडीनं राहुल गांधी यांची सुमारे 30 तास चौकशी केली आहे. यादरम्यान मनी लाँडरिंग कायद्यान्वये त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.
A statement on Congress President’s health condition. pic.twitter.com/4tVBtgyhEi
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) June 17, 2022
23 जून रोजी उपस्थित राहा, ED चं समन्स
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने 23 जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. याआधी ईडीने 8 जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली होती. कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे नवीन तारीख देण्याची मागणी केली होती.
काय आहे प्रकरण?
नॅशनल हेराल्ड' हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरु केलं होतं. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्या 'यंग इंडिया' या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरु करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरु आहे.