एक्स्प्लोर

क्रिकेटपटू के.एल. राहुलच्या बंगल्यासाठी कायद्याचे उल्लंघन करत दीड कोटी खर्चून रस्ता बनवला : काँग्रेसचा आरोप

राहुलच्या बंगल्यावर जाण्यासाठी हा रस्ता बांधण्यात आला असल्याचे समोर आले आहे. कोणतीच मान्यता तसेच परवानगी न घेता हा रस्ता बांधण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ता अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

पणजी : राजधानी पणजीला लागून असलेल्या पर्वरी मतदारसंघातील सुकुर येथे माजी महसूलमंत्री रोहन खवंटे यांच्या कालावधीत शेतातून बेकायदा रस्ता बांधण्यात आला आहे. क्रिकेटपटू के.एल. राहुल याच्या बंगल्यावर जाण्यासाठी हा रस्ता बांधण्यात आला असल्याचे समोर आले आहे. कोणतीच मान्यता तसेच परवानगी न घेता हा  रस्ता बांधण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ता अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अमरनाथ पणजीकर यांनी हा आरोप केला. यावेळी त्यांच्यासोबत पर्वरीचे काँग्रेस समितीचे अध्यक्ष अॅड. शंकर फडते, सुकुर येथील शेतकरी सालेल सिक्वेरा उपस्थित होते. माजी महसूलमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खवंटे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा रस्ता पंचायतीच्या अखत्यारीत येतो,त्याचा आपल्याशी काही संबंध नसल्याचे खवंटे यांचे म्हणणे आहे. जलस्त्रोत खात्याअंतर्गत चार किलोमीटरचा रस्ता दीड कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आला आहे. तसेच हा रस्ता बांधताना कोमुनिदाद तसेच पंचायतकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच नगरनियोजन कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच याठिकाणी शेतामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्याचा प्रयत्न आहे. या संबंधात मुख्यमंत्री, महसुलमंत्री, जिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे यावेळी शंकर फडते यांनी सांगितले. याप्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी  काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. केंद्रात तसेच राज्यात सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतीसाठी कोट्यवधी रुपये राखीव ठेवतो. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे त्यांना काहीच पडलेले नाही. जर शेतीच नष्ट करण्याचे धोरण असेल तर अर्थसंकल्पात शेतीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्याची गरजच काय? असा सवाल यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Embed widget