Congress Protest LIVE Updates : महागाईविरोधात काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन, दिल्लीत जमावबंदी लागू, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Congress Protest : आज काँग्रेसचं महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलन आहे. काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आहेत. यासंबंधित प्रत्येक अपडेट येथे पाहा.
LIVE
Background
Congress Protest : काँग्रेसने (Congress) आज (5 ऑगस्ट) महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर एक पाऊल पुढे जात काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी (4 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेत 'मी मोदींना अजिबात घाबरत नाही. सत्य दडपता येत नाही. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, पण सत्याला आळा घालता येत नाही," असं म्हटलं होतं.
दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली
काँग्रेसच्या मुख्यालयात गुरुवारी रात्रीपासूनच काँग्रेस कार्यकर्ते जमू लागले. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. "जंतर-मंतर वगळता, नवी दिल्ली जिल्ह्यातील संपूर्ण भागात CrPC कलम 144 लागू आहे. सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, रहदारीच्या कारणांमुळे 5 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली जिल्ह्यातील परिसरात आंदोलन/धरणे/घेरावाला परवानगी देता येणार नाही," असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्याने राहुल गांधी म्हणाले होते की, "लोकशाहीत आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. पोलीस परवानगी देत नाहीत, ठीक आहे, रोखून दाखवा."
राष्ट्रपती भवनावर मोर्चा, पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव
काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, "वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लादल्याच्या विरोधात काँग्रेस दिल्लीत निदर्शने करणार आहे. याशिवाय राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार असून पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव देणार आहोत." काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत.
तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, "आम्ही राष्ट्रपती भवनावरील मोर्चासाठी परवानगी मागितली आहे आणि पक्षाच्या 80 हून अधिक खासदारांना तिथे शांततेने जाण्याची परवानगी दिली जाईल अशी अपेक्षा आहे. तसंच पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेरावही घातला जाणार आहे, ज्यामध्ये CWC सदस्य आणि वरिष्ठ नेते सहभागी होतील.
राज्यांमध्ये 'राजभवन घेराव' असेल
दिल्लीत राष्ट्रपती भवनावर मोर्चा तर विविध राज्यात राजभवनाला घेराव घालण्यास काँग्रेसने सांगितलं आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी 'राजभवन घेराव' आयोजित करण्यास सांगितलं आहे, ज्यात आमदार, विधानपरिषदेचे सदस्य, माजी खासदार आणि राज्य युनिटचे वरिष्ठ नेते सहभागी होतील.
जिल्हा मुख्यालयावर निदर्शने, धरपकड
पंचायतीपासून ते जिल्हास्तरापर्यंत काँग्रेसचे लोकप्रतिनिधी जिल्हा मुख्यालयावर आंदोलन करुन जेलभरो करतील, असा निर्णयही पक्षाने घेतला आहे.
मुंबईसह दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची धरपकड
LIVE Updates#BreakingNews : मुंबईसह दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची धरपकड... राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात...#Congress #Inflation #CongressProtest#RahulGandhi #Mumbai #Maharashtra #Delhihttps://t.co/npvqdHujNl pic.twitter.com/YO2s21BvEt
— ABP माझा (@abpmajhatv) August 5, 2022
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतलं आहे. महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं देशभरात आंदोलन सुरु आहे.
#BreakingNews : राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलनhttps://t.co/uWyP8ByEz5
— ABP माझा (@abpmajhatv) August 5, 2022
पोलिसांकडून काँग्रेस नेत्यांची धरपकड सुरुच
LIVE Updates#BreakingNews : पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरुच, महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक...#Congress #Inflation #CongressProtest#RahulGandhi #Mumbai #Maharashtra #Delhihttps://t.co/ilHHWhI4RX pic.twitter.com/uLBg8OEtI6
— ABP माझा (@abpmajhatv) August 5, 2022
प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
LIVE Updates#BreakingNews : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर प्रियंका गांधीही पोलिसांच्या ताब्यात...
— ABP माझा (@abpmajhatv) August 5, 2022
महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसचं आंदोलन...#Congress #Inflation #CongressProtest#RahulGandhi #Mumbai #Maharashtra #Delhihttps://t.co/npvqdHujNl pic.twitter.com/XvNI6iGLvc
राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांचा आंदोलनात सहभाग
LIVE Updates#BreakingNews : काँग्रेसचं महागाई, बेरोजगारीविरोधात आंदोलन... राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांचा आंदोलनात सहभाग#Congress #Inflation #CongressProtest#RahulGandhi #Mumbai #Maharashtra #Delhihttps://t.co/npvqdHujNl pic.twitter.com/nHqOSkPD9I
— ABP माझा (@abpmajhatv) August 5, 2022