एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची राहुल गांधींनी घेतली भेट
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो ट्विटरवर पोस्ट करुन राहुल गांधींनी याबाबतची माहिती दिली.
![चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची राहुल गांधींनी घेतली भेट congress president rahul gandhi meet chinese communist party leaders in delhi चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची राहुल गांधींनी घेतली भेट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/06132757/rahul-gandhi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काल चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो ट्विटरवर पोस्ट करुन राहुल गांधींनी याबाबतची माहिती दिली. विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान, त्यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा हे देखील उपस्थित होते. पण काँग्रेसकडून अद्याप या भेटीची माहिती देण्यात आलेली नाही.
पण काँग्रेसने भाजपचे सर्व आरोप फोटाळून लावले होते. राहुल गांधींची चिनी राजदूतांशी भेट म्हणजे शिष्टाचार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं होतं. विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या चिनी राजदूतांसोबतच्या भेटीत उद्योगपती रॉबर्ट वाड्रा आणि राहुल गांधींच्या बहीण प्रियंका गांधीदेखील उपस्थित होत्या.
राहुल गांधींनी कम्युनिस्ट नेत्यांसोबतचे फोटो शेअर करताना म्हटलंय की, “मेंग शियांगफेंग यांच्या नेतृत्वाखाली सीपीसीचं प्रतिनिधीमंडळ, सीपीसी केंद्रीय समितीचे सदस्यांची भेट झाली. या भेटीत त्यांच्यासोबत विचारांची देवाण-घेवाण झाली.” दरम्यान, गेल्यावर्षी जुलैमध्ये भारत आणि चीन दरम्यान डोकलाम मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच, दुसरीकडे राहुल गांधींनी चीनच्या राजदूतांची भेट घेतली होती. राहुल गांधींच्या या भेटीवर भाजपने जोरदार आक्षेप नोंदवला होता. भाजपने राहुल गांधींवर चिनी नेत्यांसोबत गुप्त बैठका घेण्याचा आरोप केला होता.Met with the CPC Delegation led by Mr Meng Xiangfeng, member of the CPC Central Committee for a meaningful exchange of views. pic.twitter.com/smkisW5Hiu
— Office of RG (@OfficeOfRG) January 5, 2018
![चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची राहुल गांधींनी घेतली भेट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/06132543/Rahul-gandhi-meet-chinese-ambasedor.jpg)
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)