एक्स्प्लोर

Congress President Election : ऐनवेळी दिग्विजय सिंह यांच्याऐवजी खर्गेंच्या नावाला पसंती का मिळाली?

Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया तब्बल 22 वर्षानंतर अखेर सुरु झाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बराच ड्रामा या सगळ्या प्रक्रियेत पाहायला मिळाला.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं (Congress President Election)  चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. गांधी कुटुंबाचा पाठिंबा असलेले मल्लिकार्जुन खर्गे विरुद्ध शशी थरुर यांच्यात मुख्य लढाई होणार आहे. खर्गे यांचा उमेदवारी अर्ज भरताना जी 23 गटातले भूपिंदर सिंह हुड्डा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे खर्गे हेच पक्षातले सर्व सहमतीचे उमेदवार मानले जात आहेत.  

उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. काल संध्याकाळपर्यंत दिग्विजय सिंह यांच्या नावाची चर्चा होती. पण रात्री नाट्यमय घडामोडीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव समोर आलं. दिग्विजय सिंह हे राजघराण्यातले आहेत तर खर्गे हे दलित नेते आहेत. शिवाय दक्षिण भारतातल्या ज्या एकमेव राज्यात भाजपची स्थिती मजबूत आहे त्या कर्नाटकमधून खर्गे येतात. कर्नाटकमध्ये लवकरच निवडणुकाही होणार आहेत. 

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. खर्गे, थरुर यांच्याशिवाय झारखंडचे माजी मंत्री के एन त्रिपाठी यांनीही अर्ज भरलेला आहे. आता 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

अध्यक्षपदाच्या उमेदवारांचा इतिहास काय आहे?

शशी थरुर - केरळच्या तिरुअनंतपुरममधून तिसऱ्यांदा लोकसभा खासदार आहेत.  थरुर यूपीए सरकारच्या शेवटच्या काळात मनुष्यबळ विकास खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री होते.   सध्या 66 वर्षांचे असलेले थरुर यांनी आपलं पदव्युत्तर शिक्षण विदेशात पूर्ण केलं आहे.  संयुक्त राष्ट्रामध्ये अनेक दशकं त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं. कोफी अन्नान महासचिव संयुक्त महाराष्ट्राचे महासचिव असताना त्यांच्यासोबत काम.  2013 पर्यंत शशी थरुर हे सर्वाधिक ट्विटर फॉलोअर असलेले भारतीय होते. 2013 मध्ये नरेंद्र मोदींनी त्यांना मागे टाकलं.
           
मल्लिकार्जुन खर्गे -  कर्नाटकमधल्या गुलबर्गा मतदारसंघाचे माजी खासदार 2019 ला मात्र पराभूत झाले.  2014 ते 19 या काळात लोकसभेत काँग्रेसचे गटनेते. यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणूनही काम पाहिले. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री, कर्नाटक काँग्रेसचं अध्यक्षपदही  भूषवलं.  2018 ते 2020 या काळात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी, महाविकास आघाडीच्या स्थापनेतही त्यांचा  वाटा आहे. 

 काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्यानंतर आता खर्गे राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद लागू व्हायला हवं यासाठी राहुल गांधी आग्रही आहेत. गहलोतांनाही हाच न्याय लागू करण्यात आला होता. त्यामुळेच राजस्थानात सगळा ड्रामा घडला. आता राज्यसभेतलं हे पद दिग्विजय सिंह यांना मिळणार का याची उत्सुकता आहे. 

खर्गे कर्नाटकातले तर थरुर केरळचे त्यामुळे कुणीही अध्यक्ष झाले तरी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष 26 वर्षानंतर पुन्हा दक्षिण भारतातला असणार हे स्पष्ट आहे. याआधी पी व्ही नरसिंहराव हे 1991 ते 96 या काळात अध्यक्ष होते. नव्या अध्यक्षांच्या काळात काँग्रेसची पडझड किती थांबते हे पाहणंही महत्वाचं असेल. 

संबंधित बातम्या :

Congress President Election : दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत, मल्लिकार्जुन खर्गेंसाठी माघार 

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget