एक्स्प्लोर

Congress President Election : दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत, मल्लिकार्जुन खर्गेंसाठी माघार 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)  हे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्यानं दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Congress President Election : येत्या 17 ऑक्टोबरला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election) होणार आहे. ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेते उत्सुक असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह (Digvijay Singh ) हे देखील काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)  हे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्यानं दिग्विजय सिंह यांनी माघार घेतली आहे. मी खर्गे यांना समर्थन देत असून, त्यांच्या विरोधात लढण्याचा विचारही करु शकत नसल्याचे  दिग्विजय सिंह यांनी सांगितलं.  मी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केलं आहे. यापुढेही मी पक्षासाठी काम करत राहणार असल्याचे  दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आजचा (30 सप्टेंबर) हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण उमेदवारी अर्ज भरण्याची आजची  शेवटची तारीख आहे. राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह (Digvijay Singh) आणि केरळचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची चर्चा होती. तसेच  मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे आणि कुमारी सेलजा हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मात्र, आता दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी मल्लिकार्जून खर्गे यांनी आपलं समर्थनं दिलं आहे. दरम्यान, अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर आहे. 

कमलनाथ यांच्याशी दिग्विजय सिंह यांनी केली चर्चा

दरम्यान, आज दिग्विजय सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. त्याचवेळी अध्यक्षपदाची उमेदवारी नाकारणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही यांची देखील भेट घेतली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. दिग्विजय सिंह यांनी सकाळी फोन करुन निवडणुकीसाठी फॉर्म भरणार नसल्याचे सांगितले होते. खर्गे यांचे नाव पुढे आल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

नावनोंदणीचा ​​शेवटचा दिवस

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज (30 सप्टेंबर) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आठ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 19 ऑक्टोबरला अध्यक्षपदाचा निकाल जाहीर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget