एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Rahul Gandhi News : राहुल गांधी पहाटे चार वाजता दिल्लीतील आझादपूर मंडईत; भाज्यांच्या दरांबाबत विक्रेते, ग्राहकांसोबत चर्चा

Rahul Gandhi At Azadpur Mandi : आधी मेकॅनिक मग शेतकरी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज पहाटे दिल्लीतील आझादपूर मंडईत पोहोचले. इथे त्यांनी भाजी विक्रेते, व्यापारी आणि इतर लोकांची भेट घेतली. =

Rahul Gandhi At Azadpur Mandi : आधी मेकॅनिक मग शेतकरी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज पहाटे दिल्लीतील आझादपूर मंडईत (Azadpur Mandi) पोहोचले. इथे त्यांनी भाजी विक्रेते, व्यापारी आणि इतर लोकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. तसंच भाज्यांच्या दरांबाबत ग्राहकांसोबत चर्चा देखील केली.

राहुल गांधी भाजी मार्केटमध्ये पोहोचताच तिथे लोकांची गर्दी जमा झाली. पीटीआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात राहुल गांधी हे भाजी मंडईत विक्रेत्यांसोबत संवाद करताना, चर्चा करताना दिसत आहेत

आझादपुरी मंडईतील विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल

नुकताच आझादपूर मंडईमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आठ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये रामेश्वर नावाचा इसम रिकामी हातगाडी घेऊन उभा आहे. रिपोर्टर त्याला विचारतो की तू पहाटे टोमॅटो घेण्यासाठी आला होतास? त्यावर रामेश्वर म्हणतो हो, मी टोमॅटो घ्यायला आलो होतो, पण भाव पाहून धीर होत नाही. टोमॅटो महाग होत आहेत, म्हणून घेत नाही. 120-140 रुपये दराने टोमॅटो मिळत आहे. यामुळे आमचे नुकसान होईल. मग रिपोर्टर विचारतो की हातगाडी अशीच रिकामी राहिली, टोमॅटोशिवाय दुसरं काही तरी भरणार की नाही? यानंतर शांतता पसरते... प्रत्येक सेकंदाचा आवाज ऐकू येतो, एवढी शांतता. यानंतर रामेश्वर शांतपणे आजूबाजूला पाहतो आणि नजर झुकवून डोळे पुसतो. मग शांत होऊन तो सांगतो की, तो जहांगीर पुरी इथे भाड्याने राहतो, 4000 रुपये भाडे आहे. रिपोर्टर विचारतो, कमाई किती आहे? त्यावर रामेश्वर सांगतो रोज 100 रुपये देखील कमाई होत नाही. एवढं बोलल्यावर पुन्हा एकदा शांतता पसरते. यानंतर रामेश्वर महागाईवर आणखी बरंच काही बोलतो, त्यानंतर तो रिकामी हातगाडी घेऊन बाजारातून निघताना निघतो.

देशाची दोन वर्गात विभागणी : राहुल गांधी

राहुल गांधी यांनी 28 जुलै रोजी ट्विटरवर या विक्रेत्याचा व्हायरल व्हिडीओ शेअर केला होता. देशाची दोन वर्गात विभागणी होत आहे, असंही त्यांनी लिहिलं होतं. "एकीकडे सत्तेचे संरक्षण करणारे शक्तिशाली लोक आहेत, ज्यांच्या सांगण्यावरुन देशाची धोरणं बनवली जात आहेत आणि दुसरीकडे एक सामान्य भारतीय आहे, भाजीपाल्यासारख्या मूलभूत गोष्टीही ज्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील ही वाढती दरी आपल्याला भरुन काढायची आहे आणि हे अश्रू पुसायचे आहेत," असंही त्यांनी म्हटलं होतं.

शेतकरी आणि मेकॅनिकसोबत गप्पा

दरम्यान राहुल गांधी याआधी हरियाणातील सोनीपतमध्ये शेतकऱ्यांना भेटले होते. इथे त्यांनी शेतात काम केलं होतं. राहुल गांधी यांनी स्वत:च्या ट्विटर हँडलवरुन फोटोही शेअर केले होते, ज्यामध्ये ते शेतात काम करताना, ट्रॅक्टर चालवताना, शेतकऱ्यांशी बोलताना आणि त्यांच्यासोबत जेवण करताना दिसत आहेत. तर त्याआधी दिल्लीतील करोलबागमध्ये मोटार मेकॅनिकसोबतचे त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओही समोर आले होते. यावेळी ते वाहन दुरुस्त करताना, मेकॅनिकशी बोलताना दिसत आहे. आपल्याकडे केटीएम बाईक आहे, परंतु सुरक्षा रक्षकांमुळे ती दुचाकी चालवत येत नाही, असं राहुल गांधी यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा

Rahul Gandhi In Farm : बाईकच्या सर्व्हिसिंगनंतर आता भात पिकाची लागवड आणि नांगरणीही...राहुल गांधी शेतकऱ्यांसह शेतात राबले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण? VIDEO
Aishwarya Rai ला शाहरुखनं एक नाहीतर, तब्बल 5 चित्रपटांमधून हटवलं; Salman Khan होता कारण?
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Embed widget