एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपविरोधात काँग्रेसचं देशभरात धरणं आंदोलन
बहुमत नसतानाही कर्नाटकात भाजपने सरकार स्थापन करुन संविधानाची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
मुंबई : कर्नाटकात भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करत काँग्रेसने आज देशभरात एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारलं आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज दुपारी एक ते संध्याकाळी पाचच्या दरम्यान काँग्रेस धरणं आंदोलन करणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. काँग्रेसने जेडीएसच्या साथीने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर 104 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपनेही सत्ता स्थापनेचा दावा केला. परंतु राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेला आमंत्रित करुन बीएस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावर काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.
भाजपने कर्नाटकात लोकशाहीचा गळा घोटला आहे. बहुमत नसतानाही कर्नाटकात भाजपने सरकार स्थापन करुन संविधानाची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज एकदिवसीय धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील अमर जवान ज्योत, आझाद मैदान आणि मुंबई महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काँग्रेसचे अनेक नेते कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती निरुपम यांनी दिली आहे.
तर दिल्लीतील राजघाटावर आज दुपारी 2.45 वाजता काँग्रेस धरणे आंदोलन करणार आहे.
येडियुरप्पांची मुख्यमंत्रीपदी वर्णी
सुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर गुरुवारी (17 मे) सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपिनियतेची शपथ दिली.
येडियुरप्पा यांना आता येत्या 15 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे. जर बहुमत सिद्ध केलं, तर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होईल.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
भाजप 104
काँग्रेस 78
जनता दल (सेक्युलर) 37
बहुजन समाज पार्टी 1
कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
अपक्ष 1
संबंधित बातम्या
कर्नाटकचा बदला गोव्यात, काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करणार
कर्नाटक : बहुमत सिद्ध करताना आकड्यांची जुळवाजुळव कशी असेल?
कर्नाटक LIVE : येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान
...तेव्हा 7 दिवसातच येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपद गमावलं होतं!
एकट्या येडियुरप्पांनीच शपथ घेतली, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान!
कर्नाटक सत्तासंघर्ष : रात्री 2 वाजता सुप्रीम कोर्टात काय झालं?
सुप्रीम कोर्टात पहाटे पाचपर्यंत सुनावणी, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा
राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement