एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मी स्वत:ला काँग्रेसमधून मुक्त करतोय : शंकरसिंह वाघेला
गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
गांधीनगर : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मागील काही काळापासून बंडखोरी करणारे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी अखेर पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. याशिवाय त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचंही जाहीर केलं.
"मी स्वत:ला काँग्रेसमधून मुक्त करत आहे. मी भाजप किंवा दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही," असंही वाघेला यांनी स्पष्ट केलं. आपल्या भाषणादरम्यान शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.
शंकरसिंह वाघेला यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या समार्थकांना बोलावून सभा घेतली. "शिवाय काँग्रेसने 24 तासांपूर्वीच मला पक्षातून काढलं आहे," असं सांगितलं.
भाजपत जाणार नाही
काँग्रेसवर निशाणा साधताना वाघेला म्हणाले की, "मी माझ्या आत्मसन्मानाशी तडजोड करणार नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही काम केलं आहे. मी कुठेही जाऊ शकतो, पण भाजपत जाणार नाही."
राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस व्होटिंगसाठी वाघेला गटाला जबाबदार मानलं जात आहे. यामुळे यंदा होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी राज्यात काँग्रेसला मोठा झटका बसू शकतो.
क्रॉस व्होटिंगमध्ये माझा सहभाग नाही
"पण क्रॉस व्होटिंगमध्ये माझा सहभाग नाही. उलट मी एनसीपी नेत्यांनाही यूपीए उमेदवार मीरा कुमार यांनाच मत देण्यास भाग पाडलं," असा दावा शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. तसंच काँग्रेसच्या 57 आमदारांनी माझ्या सांगण्यावरुन मीरा कुमार यांना मत दिल्याचंही वाघेला म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement