एक्स्प्लोर

“विजय सरदेसाईंपुढे मनोहर पर्रिकर म्यावसुद्धा करत नाहीत”

सरदेसाई हे डिस्ट्रॉयर असल्याची टीका करत चोडणकर यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्यात देखील काँग्रेस सरदेसाई यांच्या सोबत युती करून आपली वाट लावून घेणार नाही असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.

गोवा : मुख्यमंत्र्यांचा उल्लेख वाघ म्हणून केला जात असला तरी गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंपुढे ते म्याव सुद्धा करू शकत नाहीत, अशी बोचरी टीका करत गोव्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. चोडणकरांनी आज फॉर्मेलिनयुक्त मासळीवरुन मुख्यमंत्री आणि सरदेसाई यांच्यावर जोरदार तोफ डागली. हैदराबाद येथील प्रशिक्षण संपवून गोव्यात दाखल होताच चोडणकर यांनी भाजप आघाडी सरकारवर फॉर्मेलिन विषयावरुन जोरदार हल्लाबोल केला. चोडणकर म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा कॅबिनेटवरील कंट्रोल पूर्णपणे सुटला आहे. मंत्री एकमेकांवर जाहीरपणे आरोप करु लागले आहेत. एकमेकांची कामे करण्यासाठी मंत्र्यांनादेखील पैसे मोजावे लागत असून इतक्या वरच्या पातळीपर्यंत भ्रष्टाचार पोहोचला आहे.” मुख्यमंत्री फक्त खुर्ची टिकवण्यात धन्यता मानत असल्याचे सांगून चोडणकर म्हणाले, “मासळी हा गोयकारपणाचा मुख्य घटक आहे. तरी देखील फॉर्मेलिनमाफियांना पाठीशी घालण्यासाठी एफडीएच्या रिपोर्टमध्ये फेरफार करुन लाखो गोमंतकीयांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार झाला, हे कधीच समर्थनीय ठरणार नाही. बाहेरील राज्यातून आयात केल्या जाणाऱ्या फॉर्मेलिनयुक्त मासळीवर बंदी घालायला मुख्यमंत्र्यांना 12 दिवस का लागतात? त्यांनी केलेली दिरंगाई संशयास्पद अशीच आहे. त्यातून त्यांना लोकांच्या आरोग्याशी काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.” गोव्यात आयात केलेल्या माशांवर कायमची बंदी घाला अशी मागणी करताना चोडणकर यांनी फक्त गोव्यात खाल्ली जात नाही तेवढी मासळी निर्यात करून बाकी मासळी गोव्यात वापरली तरी गोव्याची गरज पूर्ण होऊ शकते असे मत व्यक्त केले. गोवा फॉरवर्डसोबत युती केली नाही, हे बरेच झाले, असे सांगत चोडणकर यांनी विजय सरदेसाई यांचा चांगलाच समाचार घेतला. “सरदेसाई यांच्याशी युती करून भाजपची जी अवस्था झाली आहे ती पाहता आमची युती झाली नाही ते एका अर्थाने बरेच झाले” असे खोचक मत चोडणकर यांनी व्यक्त केले. सरदेसाई हे डिस्ट्रॉयर असल्याची टीका करत चोडणकर यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्यात देखील काँग्रेस सरदेसाई यांच्या सोबत युती करून आपली वाट लावून घेणार नाही असे चोडणकर यांनी स्पष्ट केले. एफडीएच्या संचालिका सरदेसाई यांचे फोन डिटेल्स तपासले तर त्यांच्यावर कोण कोणत्या राजकारण्यानी दबाव टाकला होता हे कळून येईल, अशी मागणी करताना उद्या देखील काँग्रेस आमदार विधानसभेत फॉर्मेलिनचा विषय लावून धरतील आणि गोमंतकीयांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उघडे पाडतील असा इशारा चोडणकर यांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
Praful Patel on Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज'मध्ये पंतप्रधान मोदींची मिमिक्री, प्रफुल्ल पटेलांकडून खरपूस समाचार; म्हणाले,'आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की...'
राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज'मध्ये पंतप्रधान मोदींची मिमिक्री, प्रफुल्ल पटेलांकडून खरपूस समाचार; म्हणाले,'आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की...'
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भारतीय खेळाडू बेशुद्ध पडला, थेट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर; वडिल पीएम मोदींचे आर्थिक सल्लागार
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भारतीय खेळाडू बेशुद्ध पडला, थेट आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर; वडिल पीएम मोदींचे आर्थिक सल्लागार
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
Amit Thackeray : 'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?

Embed widget