एक्स्प्लोर

VIDEO: मॉक ड्रिलवेळी दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, विद्यार्थिनीचा मृत्यू

मॉक ड्रिलदरम्यान बीबीएच्या या विद्यार्थिनीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकलण्यात आलं. मात्र पहिल्या मजल्याच्या गॅलरीवर डोकं आपटून तिचा मृत्यू झाला.

चेन्नई: आपत्तीला कसं सामोरं जायचं, याबाबतचं प्रात्यक्षिक सुरु असताना, एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मॉक ड्रिलदरम्यान बीबीएच्या या विद्यार्थिनीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकलण्यात आलं. मात्र पहिल्या मजल्याच्या गॅलरीवर डोकं आपटून तिचा मृत्यू झाला. लोकेश्वरी असं या 19 वर्षीय दुर्दैवी विद्यार्थिनीचं नाव आहे. तामिळनाडूतील कोईमतूरमध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. या मॉक ड्रिलसाठी स्वयंसेवक म्हणून अन्य विद्यार्थी खाली संरक्षक नेट लावून उभे होते. मात्र पीडित विद्यार्थिनीला ढकलल्यानंतर पहिल्या मजल्याच्या कठड्याला तिचं डोकं आपटून तिचा मृत्यू झाला. या घटनेचा विचलित करणारा व्हिडीओ सध्या शेअर होत आहे. लोकेश्वरी कोईमतूरमधील कलईमगल आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. काल या कालेजमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात होते. त्यावेळी अनेकांनी वरुन उड्या मारुन यशस्वी बचाव केल्याची प्रात्यक्षिकं दाखवली. मात्र लोकेश्वरीला वरुन खाली उडी मारण्याचं धाडस होत नव्हतं. ती प्रचंड घाबरत होती. त्यावेळी प्रशिक्षक अरुमुगन तिला उडी मारण्यासाठी सांगत होते, तिला प्रेरणा देत होते. मात्र तरीही लोकेश्वरी घाबरत असल्याचं पाहून, प्रशिक्षकाने तिला मागून धक्का दिला. लोकेश्वरी खाली कोसळताना तिचं डोकं पहिल्या मजल्याच्या गॅलरीला धडकलं. त्यामुळे तिला जबर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हे प्रात्यक्षिक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आयोजित केलं होतं, असा दावा कॉलेज प्रशासनाने केला आहे. मात्र तामिळनाडूचे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे आयुक्त राजेंद्र रत्नू यांनी या प्रात्यक्षिकाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. तसंच कोणतीही आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरं ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फतच आयोजित केली जातात, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, प्रशिक्षक अरुमुगन यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत, लोकेश्वरीच्या मृत्यूप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
Embed widget