एक्स्प्लोर
काश्मीर तिढा सोडवण्यासाठी वाजपेयींच्या धोरणाची गरज : मेहबूबा मुफ्ती
नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्तींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपचा महबूबा मुफ्ती सरकारला पाठिंबा राहणार हे स्पष्ट झालं आहे. तसेच काश्मीरमधील तिढा सोडवण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी वापरलेल्या धोरणाची गरज असल्याचं मुफ्ती यावेळी माध्यमांना सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात सुरक्षा रक्षकांवर दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरलेली आहे. दगडफेकीच्या घटनांमुळे काश्मीर खोऱ्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
त्यातच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मेहबूबा मुफ्तींचं सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यातच केंद्र सरकारही मेहबूबा मुफ्ती सरकारवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत होती.
अखेर आज पंतप्रधान मोदी आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर मेहबूबा मुफ्तींचे सरकार स्थिर असल्याचं स्पष्ट झालं आहे. या भेटीनंतर काश्मीर खोऱ्यात शांतता गरजेचं असल्याचं सांगून मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेची गरज आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकरानेही फुटीरतावाद्यांशी चर्चा केली होती. वाचपेयींच्या काळातील याच नितीचा वापर काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केला पाहिजे.’’
दरम्यान, मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचीही मेहबूबा मुफ्ती भेट घेणार आहेत. या भेटीत काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा रक्षकांवर दगडफेकीच्या घटनांसंदर्भात चर्चा होणार आहे. तसेच फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन दंगली भडकवण्याच्या मुद्द्यावरुनही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं मुफ्ती यांनी यावेळी सांगितलं.
हिंसाचाराला जबाबदार कोण?
काश्मीर घाटीमध्येच वारंवार दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना वारंवार का घडत आहेत, असा सवाल निर्माण होत आहे. सीआरपीएफचे आयजी ऑपरेशन्स जुल्फिकार हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनांना दहशतवादी आणि त्यांचे समर्थक जबाबदार आहेत.
अनेक ठिकाणी दहशतवादी आणि त्यांच्या भूमीगत समर्थकांचा दबाव नागरिकांवर आहे. पोलीस किंवा सीआरपीएफकडून कारवाई केली जाते, तेव्हा दहशतवाद्यांचे समर्थक जवानांवर दगडफेक करण्यासाठी नागरिकांवर दबाव टाकतात. यामुळे आमच्या कारवाईत अडथळा येतो, असं जुल्फिकार हसन यांनी सांगितलं.
लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी संरक्षण सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेऊन काश्मीरच्या सद्य परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. शिवाय गुप्तचर यंत्रणेने महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार दहशतवाद्यांनी जवानांवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत.
सुरक्षा व्यवस्थांनी पेट्रोल बॉम्बचे हल्ले रोखण्यासाठी रणनिती आखली आहे. सुरक्षा व्यवस्थांकडून प्रत्येक व्हॉट्सअॅप ग्रुपवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर दगडफेक करणाऱ्यांपैकी अशा आंदोलनकर्त्यांवर नजर ठेवली जात आहे, जे विविध आंदोलनात सहभागी असतात.
संबंधित बातम्या
काश्मीरमध्ये दंगली भडकवण्यासाठी तब्बल 300 व्हॉट्सअॅप ग्रुप
दगडफेकीनंतर काश्मीरमध्ये शाळा-महाविद्यालये बंद
काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांवरील दगडफेकीला उत्तर देण्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार
काश्मीर हिंसाचार : पेलेट गनमुळे आंदोलकांच्या डोळ्याला गंभीर इजा
श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement