एक्स्प्लोर

पालक सभेनंतर 11 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

नवी दिल्ली: शनिवारी दिल्ली सरकारने सर्वच शाळांमध्ये पालक सभेचे आयोजन केले होते. मात्र या सभेनंतर एका 11 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली आहे.   पश्चिम दिल्लीच्या ख्याला भागातील करिश्मा या 11 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. शाळेने तिच्या घरच्यांकडे केलेल्या तक्रारीने घाबरून, तिने आत्महत्या केल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे.   करिश्माची आई शाहजहा काल सकाळी पालक सभेला जात होती. त्यावेळी तिने करिश्माला सोबत येण्यास सांगितले. मात्र, ती या सभेला जाण्यास तयार नव्हती. तिच्या पालकांनी जर त्यावेळीच यामागचे कारण विचारले असते, तर तिचा जीव वाचला असता.   करिश्मा ख्याला भागातील सातवीत शिकणारी विद्यर्थीनी आहे. तिच्या पालकांच्या मते, शाळेतील शिक्षक यापूर्वीही विद्यार्थ्यांना मारत होते. मात्र, याची तक्रार कधीही शाळेकडे केली नाही. यामुळेच तिचा जीव गेल्याचे त्यांनी सांगितले.   दिल्ली सरकारच्या वतीने शनिवारी पहिल्यांदाच सर्व सरकारी शाळांमध्ये पालक सभेचे आयोजन केले होते. दिल्ली सरकार या पालक सभेवरून स्वत: ची पाठ थोपटून घेत आहे, तर दुसरीकडे या दुर्दैवी घटनेने विरोधकांनी केजरीवालांना लक्ष केले आहे.   ख्याल परीसरातील ही घटना, पालक सभेसाठी मोठमोठ्या जाहिरातबाजीचा परिणाम आहे. कारण, राज्य सरकार शिक्षकांच्या चुकांकडे लक्ष देण्यापेक्षा जाहिरातबाजीमध्येच मशगुल आहे. असा आरोप काँग्रेस अध्यक्ष अजय माकन यांनी केला आहे.   तिच्या पालकांनी शाळा प्रशासनाला या प्रकरणी दोषी धरले असून पोलिसांच्या मते, तिने पालकांनी रागावल्याने आत्महत्या केल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या घटनेच्या चौकशीसाठी दंडाधिकाऱ्याची चौकशी समिती स्थापन केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget