(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या रडारवर, फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राच्या सायबर सेलने आपला अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवला आहे. यात तीन गंभीर मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबईतल्या वीज मंडळाच्या सर्व्हरमध्ये हॅकिंगचे प्रयत्न झाले असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. देशात सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. त्याचवेळी चीनी हॅकर्सने कोरोना लस उत्पादकांच्या आयटी सिस्टमला हॅकर्सने लक्ष्य केले आहे. कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्यांनाच्या आयटी सिस्टम हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
देशात ज्या दोन कोरोना लस देण्यास परवानगी मिळाली आहे, त्यांच्या आयटी सिस्टम हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त रॉयटर्सने या सायबर इंटेलिजेंस फर्म सायफर्माच्या हवाल्याने दिले आहे. चीनमधील हॅकर्सने कोरोना लस बनवणाऱ्या कंपन्यांच्या आयटी सिस्टमला लक्ष्य केले होते. यामध्ये भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. या कंपन्यांच्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या लसी भारतात दिल्या जातात आहे. Cyfirma ने दिलेल्या माहितीनुसार, चीनी हॅकर्स APT10 ज्यांना स्टोन पांडा या नावाने ओळखण्यात येते, त्यांनी हॅकिंगचा प्रयत्न केला होता.
भारत विविध देशांना कोरोना लस उपलब्ध करून देत आहेत. जगभरातील सुमारे 60 टक्के लसींचे उत्पादन हे भारतात होते. त्यामुळे कोरोना वितरणाच्या व्यवस्थेला बाधित करण्याचा हॅकर्सचा कट होता.
याबाबत चीनकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच भारत बायोटेक आणि सिरमनेही याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच गलवान खोऱ्यातील हिंसाचाराच्या चार महिन्यांनंतर मुंबईत अचानक बत्ती गुल झाली. लोकल बंद पडल्या, शेअर बाजार ठप्प झाला, तब्बल दोन कोटी लोक अंधारात होते. कोरोनाच्या संकटात जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयं चालवावी लागली. 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या ब्लॅकआऊट मागे चीनी ड्रॅगनचा हात असल्याचे समोर आले आहे.
संबंधित बातम्या :
COVID Vaccination | कोरोना लसीकरणात सुसूत्रता कधी येणार?