(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'राहुल गांधींचे आजोबा असताना चीनने आपल्या जागा घेतल्या होत्या' : देवेंद्र फडणवीस
चीनला परत पाठवण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं. एक इंच देखील जमीन दिली नाही, हा कमजोर भारत नाही, हे त्यांनी दाखवून दिलं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
बेळगाव : राहुल गांधींचे आजोबा असताना चीनने आपल्या जागा घेतल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला सांगितलं हा पूर्वीसारखा भारत नाही. तिथून चीनला परत पाठवण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं. एक इंच देखील जमीन दिली नाही, हा कमजोर भारत नाही, हे त्यांनी दाखवून दिलं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
बेळगावात बोलताना फडणवीस म्हणाले की, जगातले केवळ 5 देश कोरोनावर लस बनवू शकले. त्या पाच देशांमध्ये माझा भारत देश आहे. सर्वाधिक लसीकरण भारत देशात झालं आहे, असं ते म्हणाले.
ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही- फडणवीस
ते म्हणाले की, इथं मराठी माणसासाठी येताय, तिथं मुंबईत मराठी माणसाला बेड मिळत नाहीत. काही लोक जिंकण्यासाठी नाही, हरवण्यासाठी उभे आहेत. इतके वर्षे संघर्ष करत होते ते कुठंच दिसत नाही. नवीन लोकं मतं खाण्यासाठी उभा आहेत. संजय राऊत हे महाराष्ट्र समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला मदत करण्यासाठी आले. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही, असंही फडणवीस म्हणाले.
Belgaum Lok Sabha | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रचार रॅली
ते म्हणाले की, ढवळ्यासोबत पवळ्या बांधला अशी स्थिती आहे. महाराष्ट्रात शिवसेना टिपू सुलतान जयंती साजरी करत आहे. टिपू सुलतान की जय म्हणणार असाल तर मराठी तुम्हाला खांदा देणार नाही. मराठी माणूस भोळा आहे पण मूर्ख नाही, असं ते म्हणाले.