20 October In History : चीनने भारतावर हल्ला केला, 1962 च्या युद्धाला तोंड फुटलं; आज इतिहासात
On This Day In History : आजच्याच दिवशी मुघल सम्राट अकबराने राजस्थानमधील चितोडगडावर हल्ला केला होता.
20 October In History : स्वतंत्र्य तिबेटचा लढा लढणाऱ्या दलाई लामांना तो लढा जिवंत ठेवण्यासाठी भारतात आश्रय घ्यावं लागलं होतं. दलाई लामांना भारताने आश्रय दिल्याचा राग चीनला होता. मग 'हिंदी चीनी भाई भाई' असा नारा देणाऱ्या भारताच्या पाठित खंजीर खुपण्याचं काम चीननं केलं. भारताच्या ध्यानीमनी नसताना चीनने 20 ऑक्टोबर 1962 रोजी हल्ला केला आणि 1962 च्या युद्धाला तोंड फुटलं. या युद्धात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
यासह इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटना पुढीलप्रमाणे,
1567- अकबराने चित्तोडगडवर हल्ला केला
मुघल सम्राट अकबराने (Akbar) 20 ऑक्टोबर 1567 रोजी राजस्थानमधील महाराणा उदयसिंह द्वितीय यांच्या चित्तोडगडावर (Chittorgarh) हल्ला केला. पण या हल्ल्याआधीच महाराणा उदयसिंह या किल्ल्यातून बाहेर पडले होते. त्यांचा सेनापती जयमल त्याच्या 8000 सैन्यासह या किल्ल्यामध्ये होता. या युद्धामध्ये अकबराचा विजय झाला. 23 फेब्रुवारी 1568 रोजी अकबराने हा किल्ला ताब्यात घेतला.
1921- फ्रान्स आणि तुर्कीमध्ये अंकारा करार
1962- भारत आणि चीन युद्धाला सुरुवात (India China War 1965)
भारताने तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा (Dalai Lama Entry In India) यांना 1959 साली आश्रय दिल्यानंतर चीनचा (Chine) तिळपापड झाला. नेफा (NEFA) म्हणजे आता अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा हिस्सा असून तो चीनचा प्रांत असल्याचा दावा आधीपासूनच चीनकडून करण्यात येत होता. तसेच लडाखचा परिसरही चीनचा (China Claim On Ladakh) असल्याचा दावा चीनने केला होता. त्यामुळे भारत आणि चीनमध्ये या दोन्ही प्रदेशावरुन सीमावाद सुरू होता. दलाई लामांना आश्रय दिल्याच्या रागातून चीनने भारतावर हल्ला केला. चीनच्या सेनेने 20 ऑक्टोबर 1962 रोजी लडाख आणि मॅकमोहन रेषेवरून (McMahon Line) एकसाथ भारतावर हल्ला केला आणि युद्धाला सुरूवात झाली. बर्फाच्छादीत, दुर्गम आणि पहाडी परिसर असल्यामुळे या ठिकाणी भारताचे कमी संख्येने सैन्य तैनात होते. चीनने सर्व तयारी करून मोठ्या लष्करासह हल्ला केला. त्यामुळे या युद्धामध्ये भारताला नामुष्कीजनक माघार घ्यावी लागली होती.
1973- ऑस्ट्रेलियाचे ऑपेरा हाऊस नागरिकांसाठी खुलं
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध असलेल्या सिडनी ऑपेरा हाऊस (Sydney Opera House) हे 20 ऑक्टोबर 1973 रोजी नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं. डेन्मार्कच्या एका वास्तुशिल्पकाराने या ऑपेरा हाऊसचे डिझाईन केलं होतं. याचं उद्धाटन ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी केलं होतं.
1973- वॉटरगेट प्रकरणाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना निक्सन यांनी हटवलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन (Richard Nixon) यांच्यावर वॉटरगेट प्रकरणी (Watergate scandal) आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करणारे न्याय विभागाचे अधिकारी आर्चिबाल्ड कोक्स यांना निक्सन यांनी पदावरुन हटवलं. त्यानंतर याचा निषेध म्हणून अटॉर्नी जनरल एलियट रिचर्डसन आणि डेप्युटी अटॉर्नी जनरल विलियम डी रुकेलशॉस यांनी राजीनामा दिला. या घटनेला 'सॅटर्डे ऑफ मासेकर' असं म्हटलं जातंय.
2002- जगातील सर्वात खोलवर असलेल्या गॅस पाईपलाईनचे तुर्कीमध्ये उद्धाटन
जगातल्या सर्वात खोलवर असलेली गॅस पाईपलाईन अशी ओळख असलेल्या तुर्की गॅस पाईपचं उद्धाटन आजच्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबर 2002 रोजी करण्यात आलं.
ही बातमी वाचा: