एक्स्प्लोर

'आंख से दूर सही दिल से कहां जाएगा...', न्यायमूर्ती शाहांच्या निरोप समारंभात सरन्यायाधीशांचा शायराना अंदाज

CJI Chandrachud On MR Shah: देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. बार असोसिएशनच्या एका कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानी कवी ओबेदुल्ला अलीम यांच्या काही ओळी वाचल्या.

MR Shah Retirement: देशाचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांनी सोमवारी (15 मे) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून निवृत्त न्यायमूर्ती एमआर शाह यांचं कौतुक केलं. या कार्यक्रमाक सरन्यायाधीशांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती एमआर शाह यांना 'टायगर शाह' असं संबोधलं. तसेच, न्यायमूर्ती शाहांचं कौतुक करताना ते म्हणाले की, 'व्यावहारिक ज्ञान आणि उत्कृष्ट सल्ले' यांमुळं शहांची कॉलेजियमला निर्णय घेण्यात ​​खूप मदत झाली.

सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन (SCBA) द्वारे आयोजित केलेल्या न्यायमूर्ती एमआर शाह यांच्या निरोप समारंभात बोलताना, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती शाह यांच्या 'संवेदनशील आणि मुक्त स्वभावाचं' कौतुक केलं आणि म्हणाले की, शहांनी त्वरीत तंत्रज्ञानाचा अवलंब केला, ज्यामुळे न्यायालयातील सुनावण्या संपूर्णपणे पेपरलेस पार पडण्यास सुरुवात झाली. सरन्यायाधीश म्हणाले की, ते न्यायमूर्ती शाह यांना त्यांच्या साहस आणि लढाऊ भावनेसाठी 'टायगर शाह' म्हणतात.

एमआर शाहांचं कौतुक करताना सरन्यायाधीशांचा शायराना अंदाज 

न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, "9 नोव्हेंबर 2022 रोजी न्यायमूर्ती शहा यांचा कॉलेजियममध्ये समावेश झाला आणि त्याच दिवशी माझी सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली... कॉलेजियममध्ये ते माझ्यासाठी व्यावहारिक ज्ञानानं परिपूर्ण असलेले एक उत्तम सहयोगी आहेत. त्याच्याकडे उत्तम सल्ल्यांचा ठेवा असायचा. जेव्हा आम्ही अल्पावधीतच पहिल्या सात नियुक्त्या केल्या, तेव्हा आम्हाला खूप मदत झाली." न्यायमूर्ती एमआर शाह यांच्याबाबत बोलताना सरन्यायाधीशांनी पाकिस्तानी कवी ओबेदुल्ला अलीम यांचाही उल्लेख केला आणि म्हणाले, "आंख से दूर सही दिल से कहां जायेगा, जाने वाले तू हमारे याद बहुत आयेगा". 

न्यायमूर्ती एमआर शहा भावूक 

निरोप समारंभासाठी बारचे आभार मानताना न्यायमूर्ती भावूक झाले. ते म्हणाले की, कोणतीही भीती, दुजाभाव किंवा लोभ न बाळगता आपलं कर्तव्य बजावलं. वेळेवर न्याय मिळवून देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. सर्वांना विनंती आहे की, त्यांनी कोणतीही प्रकरणं तहकूब करण्याच्या संस्कृतीतून बाहेर पडावं आणि कोणतीही अनावश्यक स्थगिती देऊ नये. तरुण वकिलांना माझा आणखी एक सल्ला म्हणजे, विशेष उल्लेख किंवा स्थगितीचा अवलंब करून कायद्याचा व्यवसाय करू नका, तर स्वतःला (केससाठी) तयार करा.

न्यायमूर्ती शहा पुढे बोलताना म्हणाले की, निरोप नेहमीच वेदनादायक असतो. मी माझी खेळी खूप चांगली खेळली आहे. मी नेहमी माझ्या विवेकाचं पालन केलं आहे. मी नेहमी देव आणि कर्मावर विश्वास ठेवतो. मी कधीच कशाची अपेक्षा केली नाही. मी नेहमीच गीतेचं अनुसरण केलं आहे.

न्यायमूर्ती शाह माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हवाला देत म्हणाले, 'जो कल थे, वो आज नहीं हैं. जो आज हैं वो कल नहीं होंगे. होने, न होने का क्रम इसी तरह चलता रहेगा. हम हैं, हम रहेंगे, ये भ्रम भी सदा चलता रहेगा.'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Asim Munir On India: पाकिस्तान लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पुन्हा वल्गना; भारताला थेट धमकी देत म्हणाले, 'आता परिणाम गंभीर असतील...'
पाकिस्तान लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पुन्हा वल्गना; भारताला थेट धमकी देत म्हणाले, 'आता परिणाम गंभीर असतील...'
Maharashtra Live Blog Updates:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक 
Suvendu Adhikari PA : दोन कार, टोल प्लाझा अन् यूपीआय पेमेंट; शुभेंदू अधिकारींच्या पीएच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलिस कसे पोहोचले?
दोन कार, टोल प्लाझा अन् यूपीआय पेमेंट; शुभेंदू अधिकारींच्या पीएच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलिस कसे पोहोचले?
Somnath Amrit Mahotsav: पंतप्रधान मोदींची सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थिती, मंदिरात विधिवत पूजा करत 11 तीर्थक्षेत्रांतील पाण्याने कुंभाभिषेक
पंतप्रधान मोदींची सोमनाथ अमृत महोत्सवात उपस्थिती, मंदिरात विधिवत पूजा करत 11 तीर्थक्षेत्रांतील पाण्याने कुंभाभिषेक

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Mumbai Crime News: पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
पत्नीच्या नावाचे आधार कार्ड घेऊन दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये मुक्काम; तपासानंतर सगळे हादरले, मुंबईतील खळबळजनक घटना
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
सुनेत्रा पवार म्हणाल्या आदिती माझी मुलगी; सुनिल तटकरेंकडूनही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, महाराष्ट्राच्या पहिल्या वहिनी
Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?
Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
भुवनेश्वर कुमारने इतिहास घडवला! 19 वर्षांच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा घडला 'हा' रेकॉर्ड, मुंबईचं स्वप्न भंगलं, RCBचा थरारक विजय
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
Embed widget