N Valarmathi: चांद्रयान लाँचिंगला काऊंटडाऊन देणारा आवाज हरपला; ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं 64 व्या वर्षी निधन
N Valarmathi Passes Away: चांद्रयान-3 च्या जुलैमधील लाँचिंग काऊंटडाऊनला एन वलारमथी यांनी शेवटचा आवाज दिला. श्रीहरिकोट्टामधील भविष्यातील इस्रो मिशनमध्ये त्यांची अनुपस्थिती जाणवेल.
चेन्नई: भारताच्या चांद्रयान 3 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शास्त्रज्ञ एन. वलारमथी (N Valarmathi) यांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन झालं. शनिवारी संध्याकाळी चेन्नईमध्ये त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. इस्रोच्या चांद्रयान-3 (Chandrayaan 3) मिशन लाँचच्या काऊंडाऊन मागील आवाज हा त्यांचा होता. 14 जुलै रोजी प्रक्षेपित केलेलं चांद्रयान-3 हे त्यांच्यासाठी अंतिम काउंटडाउन ठरलं.
केंद्रीय मंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. इस्रोच्या मोहिमांच्या लाँचिंगचं काऊंटडाऊन देणाऱ्या एन. वलारमथी यांच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटल्याचं राजीव चंद्रशेखर म्हणाले. त्यांच्या कुटुंब आणि मित्रपरिवाराप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.
Saddened to hear about the passing of N Valarmathi ji, the voice behind many @isro launch countdowns, including Chandrayaan 3.
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@Rajeev_GoI) September 4, 2023
My condolences to her family and friends. Om Shanti🙏🏻 pic.twitter.com/0nMu6mbrRe
इस्रोच्या माजी संचालकांकडूनही श्रद्धांजली
इस्रोच्या माजी संचालकांनीही एन. वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एन. वलारमथी यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना इस्रोचे माजी संचालक डॉ. पीव्ही व्यंकटकृष्णन म्हणाले, "चांद्रयान-3 ही त्यांची अंतिम काऊंटडाऊन घोषणा होती. एक अनपेक्षित मृत्यू. खूप वाईट वाटतंय, प्रणाम!''
The voice of Valarmathi Madam will not be there for the countdowns of future missions of ISRO from Sriharikotta. Chandrayan 3 was her final countdown announcement. An unexpected demise . Feel so sad.Pranams! pic.twitter.com/T9cMQkLU6J
— Dr. P V Venkitakrishnan (@DrPVVenkitakri1) September 3, 2023
30 जुलैला केलं शेवटचं काऊंटडाऊन
इस्रोच्या प्रक्षेपणपूर्व काऊंटडाऊनच्या घोषणांमागील एन. वलरामथी या आवाज होत्या आणि चांद्रयान मोहिमेशिवाय 30 जुलै रोजी रॉकेट लाँचिंगवेळी त्यांनी शेवटची घोषणा केली, ज्यात एका समर्पित व्यावसायिक मोहिमेचा भाग म्हणून PSLV-C56 रॉकेटने 7 सिंगापूर उपग्रहांचं लाँचिंग केलं. एन. वलारमथी या गेल्या सहा वर्षांपासून सर्व लाँचसाठी काऊंटडाऊन घोषणा करत होत्या.
हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन
शनिवारी (3 सप्टेंबर) संध्याकाळी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं, त्या काही काळापासून अस्वस्थ होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने इस्रोमधील शास्त्रज्ञांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :