Chandrayaan 3 : चांद्रयान 3 च्या यानाने पाठवला चंद्राचा पहिला फोटो..

Chandrayaan 3 Landing Live Updates : भारताचा चांद्रयान-3 या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Aug 2023 08:21 PM
Chandrayaan 3 : चंद्रावरून चांद्रयानाने पाठवला पहिला फोटो

चंद्रावरून चांद्रयानाने पाठवला पहिला फोटो


 





Chandrayaan 3 Mission Successful : 'झंडे पर चांद नहीं. चांद पर झंडा होना चाहिए...', चांद्रयान-3 च्या यशानंतर मीम्सचा पाऊस

Chandrayaan 3 Mission Successful : चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारतीयांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. इस्रोला शुभेच्छा देणारे अनेक फोटो आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत! शेवटच्या 20 मिनिटांचा थरार कसा होता

Chandrayaan 3 Successful Landing : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचं चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचलं आहे. या सोबतच भारतानं नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंग आधीची 20 मिनिटे फार महत्त्वाची आणि आव्हानात्मक होती. 


पाहा फोटो

Chandrayaan-3 : 'मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण!', चांद्रयान-3 चा इस्रोसाठी खास मेसेज

Chandrayaan-3 ISRO Moon Mission Successful : भारताचं चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचलं आहे. चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 नं इस्रोसाठी खास मेसेज पाठवला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Chandrayaan-3 Landing : अभिमानास्पद! चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

Chandrayaan-3 Mission : भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे.


वाचा सविस्तर



 


Chandrayaan-3 Landing : चंद्रापासून फक्त 135 मीटर अंतर बाकी, काही क्षणांत चांद्रयान-3 चं लँडिंग होणार

Chandrayaan-3 Landing : चंद्रापासून फक्त 135 मीटर अंतर बाकी, काही क्षणांत चांद्रयान-3 चं लँडिंग होणार

Chandrayaan 3 : चांद्रयान 3 च्या चंद्रावरील लँडिगला फक्त 5 मिनिटे बाकी

 Chandrayaan 3 : चांद्रयान 3 च्या चंद्रावरील लँडिगला फक्त 5 मिनिटे बाकी

Chandrayaan-3 Landing : अवघ्या 10 मिनिटांनंतर चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार

Chandrayaan-3 Landing : अवघ्या 10 मिनिटांनंतर चांद्रयान-3 चंद्रावर उतरणार

Chandrayaan-3 Landing : चांद्रयान-3 च्या लँडिंगचा अर्धा प्रवास पूर्ण

Chandrayaan-3 Landing : चांद्रयान-3 च्या लँडिंगचा अर्धा प्रवास पूर्ण

Chandrayaan-3 : थोड्याच वेळात चांद्रयान-3 च्या चंद्रावर उतरणार, संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे

Chandrayaan-3 : थोड्याच वेळात चांद्रयान-3 च्या चंद्रावर उतरणार, संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 च्या लँडिगचा पहिला टप्पा यशस्वी


Chandrayaan-3 : चांद्रयान-3 च्या लँडिगचा पहिला टप्पा यशस्वी


Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चं पावर डिसेंट सुरु

Chandrayaan-3 Landing Live Update : चांद्रयान-3 चं पावर डिसेंट सुरु


चांद्रयान-3 च्या लँडिगआधीची आव्हानात्मक 20 मिनिटे सुरु

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्रावर जाऊन काय करणार? चंद्रावर जाण्याचा अट्टहास नेमका कशासाठी?

Chandrayaan-3 Mission : चांद्रयान-3 चंद्रावर जाऊन काय करणार? चंद्रावर जाण्याचा अट्टहास नेमका कशासाठी? हे जाणून घ्या.


Chandrayaan-3 Landing : चांद्रयान-3 मोहिमेसमोरील आव्हानं कोणती? चांद्रयान-3 मोहिमेचे टप्पे जाणून घ्या...

Chandrayaan-3 Landing : चांद्रयान-3 मोहिमेतील सर्वात मोठं आव्हान म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणं हे आहे, यासोबतच इतरही काही आव्हानं आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.



 


Chandrayaan-3 Landing : चांद्रयान-3 च्या लँडिंगचा क्रम कसा असेल? जाणून घ्या...

ISRO Chandrayaan-3 Moon Landing : इस्रोकडून चांद्रयान-3 लँडिंगची (Chandrayaan-3 Moon Landing) तयारी पूर्ण झाली आहे. आता एकच ध्यास आहे, तो म्हणजे चंद्रावर लँडिंग चांद्रयान-3 च्या लँडिंगचा क्रम कसा असेल? जाणून घ्या...


वाचा सविस्तर...

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी पोषक वातावरण, लँडिंगसाठी प्रयत्न करणार - इस्रो

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी पोषक वातावरण, लँडिंगसाठी प्रयत्न करणार - इस्रो


 





Chandrayaan-3 Mission : इस्रोच्या मोहिमेची ओळख करून देणारी अंतरिक्ष महायात्रा वर्ध्यात
Wardha News : चांद्रयान-3 बद्धल भारतीयांच्या मनात उत्सुकता आहे. विद्यार्थ्यांना अंतराळाची ओळख व्हावी आणि इस्रोबाबतच्या विविध संशोधनाची माहिती मिळावी यासाठी शाळा महाविद्यालयात अंतरिक्ष महायात्रा पोहचवत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. ही अवकाशाची ओळख करून देणारी महायात्रा गाडी वर्ध्याच्या स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत देखील पोहचली आहे. विद्यार्थ्यांनी या गाडीमधील विविध वैज्ञानिक मॉडेलची ओळख करून घेत चांद्रयान-3 बद्दल आपली उत्सुकता दाखविली आहे.

 

 
Nagpur Students Excited for Chandrayaan-3 Landing : नागपूरच्या रमण सायन्स सेंटरमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी

चांद्रयान-3 या मोहिमेबद्दल सर्वसामान्य लोकांमध्येही मोठी उत्सुकता आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेबद्दल उत्सुकता जरा अधिकच दिसून येत आहे आणि आता ही मोहीम अंतिम टप्प्यात असल्यामुळे ही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे, नेमकी ही चांद्रयान मोहीम म्हणजे काय, याचे विविध टप्पे कोणते आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेक विद्यार्थी नागपूरच्या रमण सायन्स सेंटरला भेट देत आहेत.

Chandrayaan-3 Landing : चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगसाठी खंडोबाला दुग्धभिषेक

चांद्रयानाचे चंद्रावर यशस्वी लँडिंग व्हावे म्हणून आज खंडोबाला दुग्धभिषेक घालण्यात आला. चांद्रयान-3 आज सायंकाळी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यापूर्वी हे यान चंद्रावर सुरक्षित उतरावं म्हणून, मार्तंड देवस्थानाच्यावतीने जेजुरीच्या खंडोबा मंदिरात अभिषेक घालण्यात आला आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून  खंडोबाला प्रार्थना करण्यात आली आहे.

Rakesh Sharma : पहिले आणि एकमेव भारतीय अंतराळवीर, राकेश शर्मा सध्या काय करतात?

आजही जेव्हा एखादी अंतराळ मोहीम राबवली जाते, तेव्हा राकेश शर्मा यांची चर्चा होते. राकेश शर्मा यांचे जुने व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतात. पहिले भारतीय अंतराळवीर सध्या आहेत कुठे ते काय करतात आणि त्यांच्या आयुष्याबाबत सविस्तर जाणून घ्या.
वाचा सविस्तर




Chandrayaan-3 Mission : आता पुढचं स्टेशन थेट चंद्रच! प्रक्षेपणापासून लँडिंगपर्यंतचा चांद्रयान-3 चा 40 दिवसांचा प्रवास कसा होता?

ISRO Chandrayaan-3 : 14 जुलै रोजी चांद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण पार पडलं. आता अवघ्या काही तासांत चंद्रावर तिरंगा फडकणार आहे. चांद्रयान-3 च्या 40 दिवसांच्या प्रवासातील विविध टप्प्यांबाबत सविस्तर जाणून घ्या. 


Chandrayaan 3 Launch : उत्सुकता शिगेला! इस्रोकडून कमांड सेंटरमधील तयारीचे फोटो शेअर

Chandrayaan 3 Launch : इस्रोकडून कमांड सेंटरमधील तयारीचे नवीन फोटो ट्विट करण्यात आला आहे. लँडर मोड्युलला खाली उतरवण्याची प्रक्रिया संध्याकाळी 5.44 पासून सुरू होणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. तिथून पुढे 20 मिनिटांनी टच डाऊन होणं अपेक्षित आहे.  त्यादिशेने विक्रम लँडरच्या सगळ्या सिस्टीम उत्तम पद्धतीनं काम करतायत अशी माहिती इस्रोनं दिली आहे.





Chandrayaan 3 Landing LIVE : सोलापुरात चंद्रयान मोहीमेसाठी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरला  महारुद्राभिषेक

Chandrayaan 3 Landing LIVE : सोलापुरात भाजपाकडून चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी यासाठी ग्रामदैवत सिद्धरामेश्वरकडे साकडे घालण्यात आले आहे.  महारुद्राभिषेक करत मोहीम यशस्वी करण्यासाठी सिद्धरामेश्वरांच्या चरणी  प्रार्थना केली.  भाजपा कार्यकर्ते आणि सर्वसामान्य सोलापूरकर उपस्थित आहे. भारतीय शास्त्रज्ञाकडून चंद्राच्या दक्षिण दिशेला हे यान उतरवण्यात येणार आहे.चांद्रयानच्या या मोहिमेला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत त्यामुळे  ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी आम्ही ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांना साकडे घातले, अशी प्रतिक्रिया सोलापूरकरांनी दिली आहे. 

Chandrayaan 3 Launch: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चांद्रयान-3च्या लॅण्डिंगसाठी इस्रोला शुभेच्छा

Chandrayaan 3 Launch: राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं चांद्रयान-3च्या लॅण्डिंगसाठी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.  

Nashik : चांद्रयान 3 मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेच्यावतीने महापूजा

Nashik :  भारताच्या चंद्रयान तीन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या वतीने महापूजा करण्यात आली. नाशिकच्या प्रसिद्ध चांदीच्या गणपती मंदिरात महापूजा, आरती करत ही मोहीम यशस्वी व्हावी अशी बाप्पाकडे प्रार्थना करण्यात आली. दरम्यान यावेळी भारत माता की जय चा नारा देखील देण्यात आला.  

Chandrayaan 3 Launch: चांद्रयान-3 चे लॅण्डिंग कधी, कुठे आणि कसे LIVE पाहता येणार?

Chandrayaan 3 Launch: आजचा दिवस आणि संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांची वेळ, भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण याच क्षणी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागणार आहे. याला कारण ठरतंय भारताची चांद्रयान-३ मोहीम. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे.  चांद्रयान 3 च्या लॅण्डिंगला उरले अवघे काही तास उरले आहेत .  क्षणाक्षणाचे अपडेट एका क्लिकवर


Chandrayaan 3 Landing LIVE: इतिहासाची आस, लॅण्डिंगचा ध्यास; चांद्रयान-3 साठी शेवटची 15 मिनिटं धोक्याची

Chandrayaan 3 Landing LIVE: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-3 आज संध्याकाळी 6 वाजून 4  मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. भारताच्या अभिमानाची, स्वाभिमानाची आणि अत्यंत गौरवाची चांद्रयान-3 मोहीम... चांद्रयान-3 ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मात्र यामध्ये शेवटची 15 मिनिटं धोक्याची असणार आहे. (वाचा सविस्तर)

Chandrayaan 3 Landing LIVE:  चंद्रयान 3 मोहिमेसाठी नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या वतीने महापूजा

Chandrayaan 3 Landing LIVE:  भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेसाठी नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या वतीने महापूजा करण्यात आली. नाशिकच्या प्रसिद्ध चांदीच्या गणपती मंदिरात महापूजा करण्यात आली.  आरती करत ही मोहीम यशस्वी व्हावी अशी बाप्पाकडे प्रार्थना करण्यात आली. दरम्यान यावेळी भारत माता की जयचा नारा देखील देण्यात आला.

Chandrayaan-3:  चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात शतरुद्राभिषेक
Chandrayaan-3: श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून  विशेष रुद्र पठण व पंचामृत अभिषेक महादेवाला  करण्यात आला. इस्त्रोची चंद्रयान मोहीम  यशस्वी व्हावी आणि इस्त्रोच्या संशोधकांना यश लाभू दे  म्हणून विशेष प्रार्थना करण्यात आली .या पूजेला भक्तांनी उपस्थित राहावे असे मंदिरातर्फे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. रुद्राभिषेक झाल्यावर महाआरती करण्यात आली.त्यानंतर चंद्रयान मोहीम यशस्वी होऊदे म्हणून सामुहिक प्रार्थना करण्यात आली. 
Chandrayaan-3: भारताची चांद्रयान-३ मोहीम इतिहास घडवणार ,चांद्रयान चंद्रापासून 15 मैलांवर 

Chandrayaan-3:  आजचा दिवस आणि संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांची वेळ, भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण याच क्षणी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागणार आहे. याला कारण ठरतंय भारताची चांद्रयान-३ मोहीम. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. 


 

Nagpur Chandrayaan 3: नागपुरात राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे टेकडी गणपती मंदिरात पूजेचं आयोजन

Nagpur Chandryan 3: आज चांद्रयान-३चं लॅण्डिंग होणार आहे.  त्यासाठी भारतात प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करतोय.  चांद्रयान 3 ची सॉफ्ट लँडिंग यशस्वी व्हावी यासाठी नागपुरात टेकडी गणेश मंदिरात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातर्फे यज्ञ करण्यात येतोय. 

Chandrayaan-3:  चांद्रयान-3 च्या लँडिग वेळी पंतप्रधान मोदी ISRO सोबत व्हर्च्युअली जोडले जाणार

Chandrayaan-3:  चांद्रयान-3 च्या लँडिग वेळी पंतप्रधान मोदी ISRO सोबत व्हर्च्युअली जोडले जाणार आहे.  जोहान्सबर्ग येथून पंतप्रधान मोदी पाहाणार चांद्रयान-३ चं लॅंडिंग होणार आहे.


 





Chandrayaan 3:  चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक

Chandryaan 3:   भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी व्हावी या मोहिमेत भारताच्या शास्त्रज्ञाना यश मिळावे या साठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे गणेशास अभिषेक करण्यात आला. यासाठी दूध दही विविध फळांचे रस सुकामेवा आदींचा वापर करण्यात आला. आज संध्याकाळी भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे त्याचे लँडिंग सुरक्षित व्हावे यासाठी हा अभिषेक करण्यात आला. याशिवाय गणपती बाप्पांचा मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत बाप्पाला सजवण्यात आले मोहीम यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करण्यात आली

Chandrayaan 3 Launch : ओडिशातील प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांच्याकडून इस्त्रोला शुभेच्छा

Chandrayaan 3 Launch : ओडिशातील प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांच्याकडून इस्त्रोला शुभेच्छा दिल्या आहे.  चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी वाळू शिल्पातून शुभेच्छा दिल्या 





Chandrayaan 3 Landing LIVE: चांद्रयान-3 लॅण्डिंगचे चार टप्पे

Chandrayaan 3 Landing LIVE: चांद्रयान-3 लॅण्डिंगचे चार टप्पे



  • चंद्राच्या पृष्ठभागापासून  लॅण्डरची उंची 800 मीटर ते 1300 मीटर असेल

  • विक्रमचे सेन्सर्स कार्यान्वित  होतील आणि त्याची उंची मोजली जाईल

  • पुढच्या 131 सेकंदात लॅण्डर पृष्ठभागापासून 150 मीटरवर येईल

  • लॅण्डवरचा धोका शोधक  कॅमेरा पृष्ठभागाच्या प्रतिमा कॅप्चर करेल

  • विक्रमवर बसवलेला  धोका शोधणारा  कॅमेरा रन करेल

  • प्रतिकूल परिस्थिती असेल तर विक्रम 73 सेकंदात चंद्रावर उतरेल

  • जर नो- गो अट असेल तर 150 मीटर पुढे जाऊन थांबेल

  • पुन्हा पृष्ठभाग तपासेल  आणि सर्व ठीक असेल तर लॅण्ड होईल

चांद्रयानच्या यशामुळे मानवी वस्तीच्या शक्यता तपासल्या जाऊ शकतात

चांद्रयानच्या यशामुळे चंद्र-पृथ्वी संदर्भातील आणखी माहिती मिळेल. मानवी वस्तीच्या शक्यता तपासल्या जाऊ शकतात. कमी खर्चात मोहिमा प्रक्षेपित करणे सोपे होणार असून भविष्यात अवकाश संशोधनासाठी चंद्रावर स्थानके बांधली जातील.

Chandrayaan-3 Landing :लँडिंगचा निर्णय दोन तास आधीच?


Chandrayaan-3 Landing :  सायंकाळी 6.04 वाजता 'चांद्रयान-3'च्या लँडरची सॉफ्ट लँडिंग होऊ शकली नाही. तर ती किमान चार दिवसांनी पुढे ढकलावी लागेल. मात्र, सॉफ्ट लँडिंग 6.04 वाजता होणार की नाही याचा निर्णय दोन तास आधी जेव्हा अखेरची डीबूस्टिंग सुरू होईल, तेव्हाच घ्यावा लागणार असल्याचे राजेश मुनेश्वर यांनी सांगितले.  एकदा अखेरची डीबूस्टिंग सुरू करताना सॉफ्ट लँडिंग 6.04 वाजता करण्याचा निर्णय घेतला. तर ती 6.04 वाजताच करावी लागणार आहे. 

Chandrayaan 3 Landing Live Updates: 'चांद्रयान ३' च्या यशस्वी लँडिंगसाठी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात विशेष 'भस्म आरती

Chandrayaan 3 Landing Live Updates: 'चांद्रयान ३' च्या यशस्वी लँडिंगसाठी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात विशेष 'भस्म आरती करण्यात आले आहे चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरणार.  

Chandrayaan 3 Launch: चांद्रयान 3 च्या लॅण्डिंगला उरले अवघे काही तास उरले

Chandrayaan 3 Launch: चांद्रयान 3 च्या लॅण्डिंगला उरले अवघे काही तास उरले आहेत.  आज  संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान 3 चंद्रावर उतरणार आहेत.  चांद्रयानच्या यशासाठी भारतीयांकडून होमहवन, पूजाअर्चा.

पार्श्वभूमी

Chandrayaan 3 Landing LIVE : आज २३ ऑगस्ट २०२३. आजचा दिवस आणि संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांची वेळ हा ऐतिहासिक क्षण भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण याच क्षणी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागणार आहे. याला कारण ठरतंय भारताची चांद्रयान-३ मोहीम. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या ठोक्याला चंद्रावर लॅण्ड होणार आहे. त्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे.


भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-३ मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आहेत. चांद्रयान-३च्या सॉफ्ट लॅण्डिंगचं काऊंटडाऊन काल संध्याकाळपासून सुरू झालंय. लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झालीय. या क्षणाला चांद्रयान-३ चंद्रापासून अवघ्या १५ मैलावर असून लँडिंगची तयारी सुरू झालीय.


भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर सूर्योदयाला सुरुवात होईल आणि चांद्रयानाचं सॉफ्ट लॅण्डिंग होईल. २०१९ मधील चांद्रयान-२चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोनं चांद्रयान-३ साठी संपूर्ण काळजी घेतली. विक्रम लँडरच्या मागे, पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आलेत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट नियंत्रण कक्षाला मिळतील. चांद्रयान-३च्या लँडिंगपूर्वी दोन तास अगोदर आढावा घेतला जाईल आणि लँडिंगसाठी वातावरण पोषक नसेल तर लँडिंग २७ ऑगस्टपर्यंत लांबणीवर जाऊ शकतं, अशी माहिती इस्रोनं दिलीय..


चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण


भारत अवघ्या काही तासांमध्ये इतिहास रचणार आहे. भारत चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. घरबसल्यास आपल्या सर्वांना हा अभिमानाचा क्षण अनुभवता येणार आहे. इस्रोकडून चांद्रयान-3 च्या लँडिंगचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. लँडिंग ऑपरेशन्सचं लाईव्ह प्रक्षेपण MOX/ISTRAC कडून 23 ऑगस्ट रोजू 17:20 वाजता सुरू होणार आहे. 


चांद्रयान 3 साठी शेवटचे पंधरा मिनिटं कसोटीचे?


2019 मध्ये चांद्रयान-2 यशाच्या जवळ होतं लॅण्डर मॉड्यूलने चंद्राच्या पृष्ठभागावर 2.1 किमी उंची गाठली होती. किरकोळ तांत्रिक  बिघाड झाला आणि  लॅण्डर क्रॅश झालं. त्यामुळे चांद्रयान-3साठी  ते शेवटचे 15 मिनिटं महत्त्वाची मानली जातात. भारतीय वेळेनुसार 23 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चं लॅण्डर चंद्रावर लॅण्ड होईल पण त्या आधीचे १५ मिनिटं निर्णायक असतील कारण लॅण्डिंगची प्रक्रिया त्या शेवटच्या पंधरा मिनिटातच होणार आहे. 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.