एक्स्प्लोर
Advertisement
शेतकऱ्यांचं जून 2016 पर्यंतचं थकीत 1 लाख रु. कर्ज माफ: चंद्रकांत पाटील
नवी दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली.
दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी विविध मुद्द्यावर चर्चा केली.
याबाबत माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल, याबाबत आम्ही मॅरेथॉन भेटी घेत आहोत. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आज काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहोत. विखे पाटील, धनंजय मुंडे, राजू शेट्टी यांच्याही भेटी घेतल्या. त्याप्रमाणे आज शरद पवारांची भेट घेतली.
पवारांनी त्यांचे सहकारी बोलावले होते. त्यामध्ये सुनील तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील वगैरे होते. आम्ही आमची भूमिका मांडली.
आम्ही 30 जून 2016 पर्यंतचा थकित शेतकरी जो आहे, तो 83 टक्के आहे. त्याचं 1 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत. त्यासाठी 25 हजार कोटी रुपये लागतील. या व्यतिरिक्त ज्यांनी नियमित कर्ज भरलं, त्यासाठी आम्ही वेगळं पॅकेज तयार करतोय. याबाबत आम्ही चर्चा केली. त्याबाबत पवार साहेबांनी काही सूचना मांडल्या.
राज्याची आर्थिक स्थिती आणि अधिकाधिक शेतकऱ्यांचं समाधान याचा समन्वय साधण्यात मदत करण्याचं पवार साहेबांनी मान्य केलं.
पवार साहेबांनी मुळात समजून घेतलं, तसंच आम्ही जे योजना तयार केली आहे त्याचं त्यांनी स्वागत केलं".
याशिवाय आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्या राज्याने केली नाही, तेवढी कर्जमाफी महाराष्ट्रात होणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
कर्नाटकने 50 हजार रुपयांपर्यंत, आंध्र 50 हजारपर्यंतचे, महाराष्ट्र सरकारही थक्क व्हाल अशी कर्जमाफी करणार आहे. यासाठी आम्ही पैसे उभे करु, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
54 एकरपर्यंतचा शेतकरी आणि 1 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी, तसंच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पॅकेज हे जवळजवळ 37 हजार कोटीपर्यंत जाणार आहे.
उत्तर प्रदेश आपल्यापेक्षा अडीच पट मोठं आहे. त्यांची कर्जमाफी 36 हजार कोटी आहे, पंजाबची 8 हजार कोटी, कर्नाटकची 5 हजार कोटी आणि आंध्रचीही 5 हजार कोटी आहे, पण महाराष्ट्राची 37 हजार कोटी कर्जमाफी असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्याबाबत आज पुन्हा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. ही तिसरी भेट आहे. याशिवाय अशोक चव्हाण यांचीही आजच भेट घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement