एक्स्प्लोर
Advertisement
24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्रीवर निर्बंध, हॉलमार्कच्या प्रक्रियेसाठी वर्षाची मुदत
एखाद्या गोष्टींची गुणवत्ता किंवा दर्जा अधोरेखित करण्यासाठी त्याला 24 कॅरेट सोन्याची उपमा दिली जाते.. मात्र उद्यापासून देशात 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्य़ांची विक्री इतिहासजमा व्हायला सुरुवात होणार आहे. सोन्याच्या विक्रीसाठी हॉलमार्क अनिवार्य करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु होतेय
मुंबई : सोन्याचं हॉलमार्किंग उद्यापासून (15 जानेवारी) अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचीच विक्री होणार आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोनं मिळणार नाही देशभरात ही प्रक्रिया राबवण्यासाठी 1 महिन्याचा वेळ दिला जाणार आहे. 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्किंग अनिवार्य होणार आहे.
एखाद्या गोष्टींची गुणवत्ता किंवा दर्जा अधोरेखित करण्यासाठी त्याला 24 कॅरेट सोन्याची उपमा दिली जाते.. मात्र उद्यापासून देशात 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्य़ांची विक्री इतिहासजमा व्हायला सुरुवात होणार आहे. सोन्याच्या विक्रीसाठी हॉलमार्क अनिवार्य करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु होतेय. त्यामुळं आता 14, 18 किंवा 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होणार आहे. दरम्यान या प्रक्रियेसाठी सराफांना वर्षभराची मुदत मिळणार आहे. याचा अर्थ 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्कशिवाय दागन्यांची विक्री करणं गुन्हा असणार आहे. नियम मोडणाऱ्या ज्वेलर्सना अर्थात सराफांना 1 वर्षाची शिक्षा किंवा 5 लाखांचा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
Hallmark for Gold | उद्यापासून 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांची विक्रीवर निर्बंध, हॉलमार्क अनिवार्य | ABP Majha
भारतीय मानक ब्यूरो (BIS) मध्ये नोंदणी करण्यासाठी आणि हॉलमार्कसाठी विक्रेत्यांना एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना 1६ जानेवारीला काढण्यात येणार आहे. यामध्ये 15 जानेवारी 2021 पासून हॉलमार्कचेच दागिने विकण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. बीआयएस एप्रिल 2000 पासून हॉलमार्कची योजना राबवत आहे. सध्या बाजारात जवळपास 40 टक्केच दागिने हॉलमार्क असलेले विकले जात आहेत.
संबंधित बातम्या :
अॅमेझॉनचे जेफ बेजोस भारत दौऱ्यावर, महात्मा गांधींना वाहिली आदरांजली
शिवभोजन योजनेचा 26 जानेवारीला शुभारंभ, राज्यात 50 ठिकाणी केंद्र उभारणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement