एक्स्प्लोर
Advertisement
तरुणांसाठी खुशखबर, केंद्र सरकार 3 लाख नोकऱ्या देणार!
नवी दिल्ली : सरकारी नोकरी हे जर तुमचं स्वप्न आहे तर पुढील वर्षी हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने देशभरातील तरुणांना ही खुशखबर दिली आहे. पुढील वर्षी केंद्रात 2.83 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
केंद्र सरकार पुढील वर्षी नोकऱ्या उपलब्ध करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात केली होती.
2018 मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या 35.67 लाख होईल. 2016 च्या तुलनेत ही संख्या 2.83 लाखांनी जास्त आहे. 2016 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 32.84 होती.
गृहमंत्रालय 2018 मध्ये 6076 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. यानंतर गृहमंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 24778 होईल.
पुढील वर्षी पोलिस विभागात मोठी भरती होणार आहे. तब्बल 1.06 लाख कर्माचाऱ्यांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे त्यांची एकूण संख्या 11,13,689 होईल.
अर्थसंकल्प दस्तऐवजांनुसार, परराष्ट्र मंत्रालयात पुढील वर्षी 2109 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. यानंतर त्यांची एकूण संख्या वाढून 9,294 होईल.
मोदी सरकारने नुकतंच कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्रालयाची स्थापना केली आहे. या मंत्रालयात 2018 पर्यंत 2027 जागा भरण्याची सरकारची योजना आहे. 2016 मध्ये या मंत्रालयात फक्त 53 कर्मचारी होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
औरंगाबाद
निवडणूक
Advertisement