एक्स्प्लोर

दुखलं-खुपलं की सर्रास मेफ्टल स्पा घेताय? थांबा, केंद्र सरकारनं दिलाय गंभीर इशारा

Issues Alert on Painkiller Meftal : मेफेनॅमिक अॅसिड-आधारित पेनकिलर मेफ्टल स्पाचा उपयोग संधिवात, हाडांचे रोग ऑस्टियोआर्थरायटिस, मुलींना होणाऱ्या मासिक पाळीतील वेदना, सूज, ताप आणि दातदुखी यावर उपचार करण्यासाठी केला जातो.

Central Government Issues Alert Painkiller Meftal : नवी दिल्ली : अंगदुखी (Body Pain), दातदुखी (Toothache) तसेच, काहीही दुखलं खुपलं की, अगदी सर्रास मेफ्टल स्पा (Meftal Spas) या औषधाचं सेवन केलं जातं. पेनकिलर (Painkiller) म्हणून वापरलं जाणारी मेफ्टल स्पा प्रत्येक घरात असतेच. पण आता याच औषधाबाबत सर्वांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे.

भारतीय फार्माकोपिया कमिशन (IPC) नं मेफ्टल संदर्भात औषध आणि सुरक्षेबाबतचा इशारा दिला आहे. तसेच, नमूद केलं आहे की, मेफ्टलमध्ये असलेलं मेफेनामिक अॅसिड आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कालांतरानं या औषधामुळे गंभीर दुष्परिणामांचाही सामना करावा लागू शकतो. मेफ्टलच्या सेवनानं इओसिनोफिलिया आणि सिस्टीमिक लक्षणे सिंड्रोम (DRESS) होऊ शकतो.

मेफेनॅमिक अॅसिड-आधारित पेनकिलर मेफ्टल स्पाचा उपयोग संधिवात, हाडांचे रोग ऑस्टियोआर्थरायटिस, मुलींना होणाऱ्या मासिक पाळीतील वेदना, सूज, ताप आणि दातदुखी यावर उपचार करण्यासाठी केला जातो.

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, आयपीसीनं सुरक्षेसंदर्भात इशारा देताना म्हटलं आहे की, फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया (PVPI) डेटाबेसमधून मेफ्टलच्या दुष्परिणामांच्या प्राथमिक विश्लेषणात DRESS सिंड्रोम उघड झाला आहे.

DRESS सिंड्रोम म्हणजे काय?

ड्रेस सिंड्रोम ही काही औषधांमुळे होणारी गंभीर अॅलर्जी आहे. त्यामुळे त्वचेवर लाल पुरळ उठतात, ताप येतो आणि लिम्फ नोड्स सुजतात. हे औषध घेतल्यानंतर दोन ते आठ आठवड्यांच्या दरम्यान ही अॅलर्जी होऊ शकते.

30 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अलर्टमध्ये केंद्र सरकारनं असं म्हटलं आहे की, "डॉक्टर, रुग्ण आणि ग्राहकांना मेफ्टल स्पा या औषधाच्या वापरानंतर जाणवणाऱ्या दुष्परिणामांच्या शक्यतांचं बारकाईनं निरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे." तसेच, पुढे सांगितलं आहे की, "औषध घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिसली तर तुम्ही वेबसाईट www.ipc.gov.in किंवा Android मोबाईल अॅप ADR PvPI आणि PvPI हेल्पलाइनद्वारे एक फॉर्म भरू शकता आणि अंतर्गत तक्रार नोंदवू शकता. PvPI च्या राष्ट्रीय आयोग समन्वय केंद्राकडे प्रकरणाचा अहवाल द्या."

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget