नवी दिल्ली : देशातील शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्राय आणि आरोग्य मंत्रालयाने संयुक्तपणे देशातील सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संपूर्ण देश तसेच केंद्रशासित प्रदेशांत तंबाखूमुक्त नीतीचे पालन केले जावे, असे या मार्गदर्शक सूचनेत म्हणण्यात आलं आहे.
केंद्र सरकारने एका सर्वेक्षणाचा उल्लेख केला
केंद्राच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्रालयाने संयुक्तपणे जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत तंबाखू सेवनाचे मुलांवर तसेच तरुणांवर होणाऱ्या परिणांबद्दल भाष्य करण्यात आले आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनात 2019 सालच्या एका सर्वेक्षणाचा उल्लेख करण्यात आला आहे. "ग्लोबल यूथ तोबाको सर्वेक्षण (GYTS) 2019 नुसार 13 ते 15 वयोगटातील साधारण 8.5 टक्के मुलं ही वेगवेगळ्या माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात. यात विशेष चिंतेची बाब म्हणजे दररोज साधारण 5500 लहान मुलं तंबाखुचे सेवन करतात," असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.
फ्री एज्यूकेशनल इन्स्टिट्यूशन (ToFEI) म्यॅन्यूअलचे महत्त्व सांगितले
साधारण 55 टक्के तरूणांना वयाच्या 20 वर्षांआधीच तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लागते, असेही सरकारने दिलेल्या सूचनेत म्हटले आहे. तसेच तंबाखूमुक्त धोरणाच्या अंमलबजावणीच्या महत्त्वावरही या सूनचेत जोर देण्यात आला आहे. तंबाखू फ्री एज्यूकेशनल इन्स्टिट्यूशन (ToFEI) म्यॅन्यूअलचे महत्त्वही या सूचनेत सांगण्यात आले आहे. शैक्षणिक संस्था ToFEI म्यूनअलच्या मदतीने तंबाखूविरोधी धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतात, असंही या सूचनेत म्हणण्यात आलं आहे. केंद्र सरकारने 31 मे म्हणजेच तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने सोशिओ इकोनॉमिक एज्यूकेशनल डेव्हलपमेंट सोसायटीच्या सहकार्याने ToFEI धोरण जारी केले होते.
हेही वाचा :
Pune News : समोसामध्ये बटाट्याऐवजी कंडोम, दगड आणि तंबाखू ; पुण्यातील किळसवाण्या प्रकाराने खळबळ