Tirupati Laddu: अमूल इंडियाने (Amul India) तिरुपती मंदिराला (Tirupati Temple) तूप (ghee) पुरवण्याबाबत एक दिवसापूर्वी स्पष्टीकरण जारी केले होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमला अमूल तूप कधीच पुरवले नाही. असे असतानाही सोशल मीडियावर असे अनेक दावे केले जात होते. या सर्व अफवा असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यांमध्ये तथ्य नाही. अशातच आता आता कंपनीने अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.


 36 लाख लोकांनाही याचा फटका 


अमूल ब्रँड चालवणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने तिरुपती मंदिराला तूप पुरवण्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. अमूल इंडियाचे एमडी जयेन मेहता यांना दिलेल्या माहितीनुसार, 36 लाख दूध उत्पादक आमच्याशी जोडले गेले आहेत. अशा अफवा पसरवल्याने त्यांच्यावरही विपरीत परिणाम होईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या 7 वापरकर्त्यांविरोधात पोलिसांनी दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. लाडू प्रसादात मिसळलेले तूप अमूल ब्रँडचे असल्याचा दावा या 7 जणांनी केला होता, असे पोलिस प्रकरणात म्हटले आहे. दूध महासंघाच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला आहे.


अमूलने कधीही तिरुपती मंदिरात तूप पाठवले नाही


अमूल इंडियाने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट करताना सांगितले होते की, त्यांनी तिरुपती मंदिरात कधीही तूप पाठवलेले नाही. आमचे तूप कठोर चाचण्यांनंतर बनवले जाते. यामध्ये भेसळीला वाव नाही. अमूल तूप तयार करण्यासाठी आमच्याकडे ISO प्रमाणित उत्पादन संयंत्र आहे. तूप बनवण्यासाठी वापरले जाणारे दूधही आमच्या कलेक्शन सेंटरमध्ये येते. दुधाची गुणवत्ता चाचणीही येथे केली जाते. आम्ही FSSAI च्या सर्व मानकांचे पालन करून आमची सर्व उत्पादने तयार करतो. आम्ही गेल्या 50 वर्षांपासून चांगली उत्पादने देऊन लोकांचा विश्वास जिंकला आहे. अमूलबद्दल असा खोटा प्रचार कोणत्याही माध्यमातून करू नये ही विनंती.


लाडूच्या प्रसाद विक्रीतून दरवर्षी 500 कोटी रुपयांची कमाई


आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर सध्या एका वेगळ्या वादाचे केंद्र बनले आहे. तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये (Laddu) प्राण्यांची चरबी असलेले तूप आणि माशाचे तेल मिसळल्याचा आरोप केला जातोय. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर हे आरोप केले आहेत. दरम्यान, देशातील या सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये दरवर्षी लाडूच्या प्रसाद विक्रीतून दरवर्षी 500 कोटी रुपये कमवते. तामिळनाडूच्या एआर डेअरी फूड्सकडून केवळ 320 रुपये किलो दराने गाईचे तूप विकत घेतले जात होते. आता मंदिरातील तूप पुरवठ्याचे कंत्राट कर्नाटक दूध महासंघाला देण्यात आले आहे. त्यांच्याकडून 475 रुपये किलो दराने तूप पुरवले जाते.


महत्वाच्या बातम्या:


Tirupati Laddu : लाडू विक्रीतून तिरुपती मंदिराकडे किती पैसे जमा होतात? दररोज बनतात 3 लाख लाडू