पुणे : समोसामध्ये (Samosa) बटाट्याच्या भाजीऐवजी कंडोम (Condom), दगड (stone) आणि तंबाखू (Tomaco) असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका कंपनीच्या कॅन्टीनमधून हा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील औंध परिसरात ही कंपनी आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


कॅटालिस्ट सर्विस सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे ऑटोमोबाईल कंपनीला जेवण पुरवण्याचं काम दिलं होतं. कॅन्टीनचं जुनं कॉन्ट्रॅक्ट रद्द करुन ते कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला देण्यात आलं. त्यामुळे कॅन्टीन चालकाने हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे.  आधी SRS एंटरप्राइजेज नावाच्या कंपनीला समोसे तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. त्यानंतर काही कारणामुळे हे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आणि दुसऱ्याला दिलं. याचाच काटा काढण्यासाठी मालक रहीम शेख याने हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी  रहीम शेख, अझर शेख,  मझर शेख, फिरोज शेख ऊर्फ मंटु आणि विकी शेख या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


काटा काढण्यासाठी केला किळसवाणा प्रकार


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोज आणि विक्की हे दोघेही एसआरए एंटरप्रायझेसचे कर्मचारी आहेत. एसआरए एंटरप्रायझेसच्या तिघांनी मनोहर एंटरप्रायजेसने पुरविलेल्या समोसामध्ये भेसळ करायला सांगितले होतं. काही काळापूर्वी ऑटो फर्मच्या कॅन्टीनला कंत्राट एसआरए एंटरप्रायजेसकडे होते, मात्र त्यांचा करार रद्द करण्यात आला. त्यानंतर त्या कंपनीने पुरवलेल्या जेवणात पट्टी आढळून आली. दुसऱ्या कंपनीची बदनामी करून कंत्राट रद्द करण्याच्या हेतूने हा प्रकार करण्यात आला. रहीम शेख, अजहर शेख आणि मजहर शेख अशी एसआरए एंटरप्रायझेसच्या पार्टनरची नावं आहेत. 


नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त


हा प्रकारपाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. कंपनीतील कॅंन्टीनमध्ये असे अघोरी किंवा किळसवाणे प्रकार सुरु असतील तर हे अनेकांच्या जीवावर बेतू शकतं, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Prakash Ambedkar : ठाकरे आणि शरद पवारांनी स्वतःमध्ये बदल करावेत, प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र


Jaya Bachchan : अमिताभ आणि मुलांसाठी करिअरचा त्याग केला? जया बच्चन यांनी अखेर मौन सोडले


Vijay Wadettiwar : राज ठाकरे म्हणजे वाघ माणूस, दिल्लीसमोर झुकणार नाही; मात्र त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न : विजय वडेट्टीवार