एक्स्प्लोर

पोलखोल! हार्दिक पटेल आणि राहुल गांधींच्या भेटीचे पुरावे

सीसीटीव्ही फुटेजनुसार, हॉटेलच्या रुम नंबर 224 मध्ये हार्दिक पटेल जात आहे आणि काही वेळानंतर याच रुममधून राहुल गांधी बाहेर पडताना दिसत आहेत.

अहमदाबाद : निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र त्यापूर्वी समोर आलेल्या एक घटनेने गुजरातमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ती घटना आहे, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार नेता हार्दिक पटेल यांच्यात हॉटेलमध्ये झालेल्या भेटीची. राहुल गांधींना आपण भेटलो नाही, असा दावा हार्दिक पटेलने केला. मात्र एबीपी न्यूजच्या हाती असे पुरावे लागले आहेत, ज्याने हार्दिक पटेलच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. हार्दिक पटेल गेलेल्या रुममधून राहुल गांधी बाहेर पडले अहमदाबादच्या ताज उमेद हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी न्यूजच्या हाती लागलं आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, हॉटेलच्या रुम नंबर 224 मध्ये हार्दिक पटेल जात आहे आणि काही वेळानंतर याच रुममधून राहुल गांधी बाहेर पडताना दिसत आहेत. मात्र हार्दिक पटेल आणि राहुल गांधी या फोटोंमध्ये सोबत असल्याचं कुठेही दिसत नाही. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हार्दिक पटेलची पहिली प्रतिक्रिया एबीपी न्यूजने हा खुलासा केल्यानंतर हार्दिक पटेलने थेट उत्तर देण्याऐवजी भाजपवर निशाणा साधला आहे. ट्विटरवर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली. ''हजारो लिटर दारु भाजपच्या निगराणीत सीमेवरुन गुजरातमध्ये येते. तेव्हा हे सीसीटीव्ही कुठे जातात?'' असा सवाल हार्दिक पटेलने केला. https://twitter.com/HardikPatel_/status/923040534645571584 ''राहुल गांधींना जाहीरपणे भेटेन'' यापूर्वीही एबीपी न्यूजशी बोलताना हार्दिक पटेलने या भेटीच्या वृत्ताचं खंडन केलं होतं. ''त्या हॉटेलमध्ये काही गुन्हा झालेला नाही किंवा काही वाद नाही, मग सीसीटीव्ही फुटेज लीक कसं झालं, असं हार्दिक पटेल म्हणाला होता. मी राहुल गांधींना भेटलो नाही, पण भेटलो तरी कुणाला काय हरकत असावी? मी त्यांना त्यांच्या पुढच्या दौऱ्यात भेटणार आणि आणि जाहीरपणे भेटणार आहे'', असं हार्दिक पटेलने सांगितलं. काँग्रेसचंही संभ्रम निर्माण करणारं उत्तर एबीपी न्यूजने या प्रकरणावर काँग्रेसचे गुजरात प्रभारी अशोक गहलोत यांनाही प्रश्न विचारला. मात्र अशोक गहलोत यांनी या प्रश्नाला थेट नकारही दिला नाही किंवा ठामपणे सांगितलंही नाही. प्रश्न राहुल गांधींच्या भेटीचा आहे, तर त्यांनाच विचारा, असं उत्तर अशोक गहलोत यांनी दिलं होतं. पाहा व्हिडिओ :

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget