एक्स्प्लोर

सोनिया गांधींनी लोकसभेत मुद्दा मांडल्यानंतर सीबीएसईच्या परीक्षेतील 'तो' वादग्रस्त परिच्छेद मागे 

शुक्रवारी सीबीएसईच्या (CBSE) दहावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी परीक्षेचा पेपर झाला. या परीक्षेत देण्यात आलेल्या एका परिच्छेदामुळे विद्यार्थी, पालकांसह राजकीय व्यक्तींनी संताप व्यक्त केला होता.

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi ) यांनी आज लोकसभेत मुद्दा उपस्थित केल्यानंतर सीबीएसईच्या (CBSE)  परीक्षेतील वादग्रस्त परिच्छेद मागे घेण्यात आला आहे. सीबीएसईने त्याबाबतचे परिपत्रक काढून माहिती दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या परिच्छेदावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सर्वच विद्यार्थ्यांना पूर्ण गूण देण्यात येणार असल्याचेही सीबीएसईच्या परीपत्रकात म्हटले आहे. 

शुक्रवारी सीबीएसईच्या (CBSE) दहावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी परीक्षेचा एक पेपर झाला. या परीक्षेत देण्यात आलेल्या एका परिच्छेदामुळे विद्यार्थी, पालकांसह राजकीय व्यक्तींनी संताप व्यक्त केला होता. शुक्रवारी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसल्यानंर पेपरमध्ये देण्यात आलेला परीच्छेद पाहून धक्काच बसला. या प्रकरणावर कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी याबाबत ट्विटही केले होते. यानंतर अखेर सीबीएसईने तो वादग्रस्त परिच्छेद मागे घेत असल्याची माहिती दिली. 

“बायकांच्या मक्तेदारीमुळे पालकांचा मुलांवरील अधिकार नष्ट झाला. पुरुषाला त्याच्या मुळ स्थानावरून खाली आणण्यासाठी पत्नी आणि आईने स्वत:वरील बंधने पायदळी तुडवली. पती आधी "स्वतःच्या घराचा मालक" होता. परंतु, पत्नीने त्याला आपल्या आज्ञेखाली आणले. त्याबरोबरच मुलांना आणि नोकरांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्यास शिकवले गेले" असे वर्णन या परीच्छेदात करण्यात आले होते.  

अनेक विद्यार्थ्यांना हा स्त्रीयांचा अपमान वाटला होता. या उताऱ्याखाली देण्यात आलेल्या एका बहुपर्यायी प्रश्नात लेखाकची वैशिष्ट्य विचारण्यात आली आहेत. या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक विद्यार्थ्यांनी “पुरुष अराजकतावादी डुक्कर” असे उत्तर लिहिले. CBSE च्या उत्तर पत्रीकेनुसार या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे लेखक “जीवनाकडे हलक्या-मनाच्या दृष्टीकोनातून पाहतो ”. असे आहे. तर इतर पर्यायांमध्ये लेखक "एक असंतुष्ट पती" किंवा "त्याच्या कुटुंबाचे मनापासून  कल्याण साधणारा". असा पर्यायांचा समावेश करण्यात आला होता. 

दरम्यान, “परीक्षेत असा प्रतिगामी आणि अयोग्य परिच्छेद देण्यात आला यावर माझा विश्वास बसत नाही. 2021 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत CBSE बोर्ड हे करू शकते हे खूप निराशाजनक आहे,” असा संताप चेन्नईच्या एका शाळेतील विद्यार्थिनीने व्यक्त केला होता. 

संबंधित बातम्या

दहावीच्या सीबीएसईच्या परीक्षेतील प्रश्नावरून संताप, विद्यार्थ्यांनी लिहिले आर्श्चयकारक उत्तर

'त्यांच्या घरी पोर होईल का नाही हे मी का सांगू?', राज ठाकरेंचा टोला अन् हशा

महत्त्वाच्या बातम्या

देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र

Embed widget