एक्स्प्लोर
'नीट'मध्ये पुण्याचा अभिषेक राज्यात अव्वल, देशात पाचवा

नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) तर्फे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट म्हणेजच नीट 2017 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पंजाबच्या नवदीप सिंगने 697 गुण मिळवत मुलांमध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रातून पहिला आलेला पुण्यातील अभिषेक डोग्रा देशात पाचवा आला आहे. cbseneet.nic.in या वेबसाईटवर नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. अव्वल क्रमांकानुसार प्रत्येक परीक्षार्थीचा पर्सेंटाईल काढून गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. या मेरीट लिस्टनुसार एमबीबीएस किंवा बीडीएसच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. 28 जूनपासून मेडिकलच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. मुलांमध्ये (मेल कॅटेगरी) पंजाबच्या नवदीप सिंगने 697 गुण मिळवत पहिला रँक (All India Rank (AIR) 1) पटकवला आहे. तर फिमेल कॅटेगरीमध्ये निकिता गोयल टॉपर ठरली आहे.
cbseresults.nic.in आणि results.gov.in या दोन्ही वेबसाईट्सवरही नीटचा निकाल पाहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने सीबीएसईला 26 जून पूर्वी नीट 2017 चा निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते. कोणत्या अभ्यासक्रमासाठी किती सीट्स? एमसीआय आणि डीसीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार 470 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या 65 हजार 170 जागा आहेत. 308 दंतवैद्यकीय (डेन्टल) महाविद्यालयांमध्ये 25 हजार 730 जागा उपलब्ध आहेत. असा पाहा निकाल – निकाल पाहण्यासाठी cbseneet.nic.in आणि www.cbseresults.nic.in या वेबसाईटवर लॉगऑन करा. – NEET 2017 Results वर क्लिक करा. – तिथे तुमचा क्रमांक आणि जन्मतारीख टाका. – यानंतर तुमचा निकाल दिसेल. देशभरात 7 मे रोजी नीट परीक्षा पार पडली होती. यंदा सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. यापैकी 10.5 लाख विद्यार्थ्यांनी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये परीक्षा दिली, तर उर्वरित 1.25 लाख विद्यार्थ्यांनी इतर आठ भाषांची निवड केली होती. यावर्षी नीट परीक्षा 10 भाषांमध्ये घेण्यात आली होती.
| क्रमांक | परीक्षार्थीचं नाव | लिंग | गुण | पर्सेंटाईल स्कोअर | राज्य |
| 1 | नवदीप सिंग | पुरुष | 697 | 99.999908 | पंजाब |
| 2 | अर्चित गुप्ता | पुरुष | 695 | 99.999725 | मध्य प्रदेश |
| 3 | मनिष मुलचंदानी | पुरुष | 695 | 99.999725 | मध्य प्रदेश |
| 4 | संकीर्थ सदानंदा | पुरुष | 692 | 99.999633 | कर्नाटक |
| 5 | अभिषेक डोग्रा | पुरुष | 691 | 99.999358 | महाराष्ट्र |
आणखी वाचा























