एक्स्प्लोर
Advertisement
सीबीएसईचा मोठा निर्णय, 10 वी, 12 वीचे फुटलेले पेपर पुन्हा होणार!
दहावी आणि बारावीचे फुटलेले पेपर पुन्हा घेण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने पेपरफुटीमुळे मोठा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीचे फुटलेले पेपर पुन्हा घेण्यात येणार आहेत.
दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा होणार आहे. त्याबाबतचं वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.
कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून बोर्डाने दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. दहावीचा गणिताचा पेपर 28 मार्चला झाला होता. तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर 27 मार्चला घेण्यात आला होता.
दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांदरम्यान, पेपरफुटीच्या अनेक घटना घडल्या. त्याचं लोण महाराष्ट्रातही पसरलं होतं. या पेपरफुटीमुळे सीबीएसईने दोन पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आठवडाभरात परीक्षेच्या तारखा जाहीर होतील, असं सीबीएसई बोर्डाने म्हटलं आहे.
सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा. दहावीचा गणिताचा, बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा होणार. पेपर फुटीच्या घटनांनंतर सीबीएसईचा निर्णय. या पेपरच्या तारखा लवकरच जाहीर होणार. pic.twitter.com/eqseAk4cRk
— prashant kadam (@_prashantkadam) March 28, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
विश्व
Advertisement