एक्स्प्लोर
Advertisement
तात्काळ तिकीटांचा घोळ, सीबीआयचा प्रोग्रॅमरच अटकेत
या हायटेक घोटाळ्यात सॉफ्टवेअरच्या मार्फतच अजय गर्ग प्रत्येक तिकीटाची माहिती ठेवायचा आणि त्यानुसार आपलं कमिशन घ्यायचा.
नवी दिल्ली : ट्रेनची तात्काळ तिकीटं मिळवण्यात येणाऱ्या अडचणींमागे मोठा घोटाळा असल्याचं उघड झालं आहे. सॉफ्टवेअरच्या साहाय्याने हा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे हे सॉफ्टवेअर सीबीआयच्याच एका असिस्टंट प्रोग्रॅमरने तयार केलं आहे. सीबीआयने अजय गर्ग नावाच्या प्रोग्रॅमरला अटक केली आहे.
सामान्यांकडून अधिक रक्कम
सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अजय गर्गने बनवलेलं सॉफ्टवेअर जौनपूरचा अनिल कुमार गुप्ता नावाचा इसम बुकिंग एजंटपर्यंत पोहोचवत असे. पण एजंट्सना अजय गर्गबाबत कोणतीही माहिती नसायची.
सॉफ्टवेअर मिळाल्यानंतर बुकिंग एजंटला एकाच वेळी शेकडो तात्काळ तिकीटांची बुकिंग करता यायची. परिणामी काही मिनिटांतच तिकीटं संपायची. त्याचा फायदा घेत तो सामन्यांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करायचा.
तात्काळ तिकीटातून होणाऱ्या अतिरिक्त कमाईचा एक भाग अनिल कुमार गुप्ताला मिळत असे. त्यानंतर अनिल गुप्ता अजय गर्गला त्याचा हिस्सा द्यायचा.
हायटेक घोटाळ्याचा पर्दाफाश
या हायटेक घोटाळ्यात सॉफ्टवेअरच्या मार्फतच अजय गर्ग प्रत्येक तिकीटाची माहिती ठेवायचा आणि त्यानुसार आपलं कमिशन घ्यायचा. अजय गर्ग आपला वाटाही हायटेक अंदाजात घ्यायचा. अनिल गर्ग अनिल कुमार गुप्ताकडून बिटक्वॉईनच्या माध्यमातून त्याचा वाटा घेत असे. रोख रक्कमेची गरज लागली तर होत हवालामार्फतही पैसे मागत असे. इतकंच नाही, अनिल कुमार गुप्ता दिल्लीत आल्यावर तो गर्गला थेट रोख रक्कमही द्यायचा, असं सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
एक वर्षापासून घोटाळा
सीबीआयला मिळालेल्या माहितीनुसार, अजय गर्ग मागील एक वर्षांपासून हा घोटाळा करत आहे. सीबीआयमध्ये काम करण्यापूर्वी अजय गर्ग आयआरसीटीसीमध्ये प्रोग्रॅमर होता. आयआरसीटीसीमध्ये 2007 पासून 2011 पर्यंत त्याने नोकरी होती. या दरम्यान त्याने वेबसाईटमधल्या त्रुटी ओळखल्या आणि नवं सॉफ्टवेअर बनवून घोटाळा केला.
मास्टरमाईंड अटकेत
गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने अजय गर्ग आणि अनिल कुमार गुप्ताला अटक केली आहे. साकेतच्या विशेष कोर्टाने अजय गर्गला पाच दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावली आहे. तिथे त्याची चौकशी सुरु आहे. तर जौनपूरमधून अटक केलेल्या अनिल कुमार गुप्ताची ट्रान्झिट रिमांडसाठी दिल्लीला रवानगी करण्यात आली आहे.
पुरावे जमवण्यासाठी सीबीआयने दिल्ली, मुंबई आणि जौनपूरमधील 14 ठिकाणांवर छापा टाकला. या छाप्यात 89 लाख रुपये रोख, 61 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, 15 हार्डडिस्क, 52 मोबाईल फोन, 24 सिम कार्ड, 10 नोटबुक, सह राऊटर, चार डोंगल, 19 पेन ड्राईव्ह आणि इतर दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement