एक्स्प्लोर

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचा छापा

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र  कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नईमधील घरावर सीबीआयने आज सकाळी छापा टाकला. सीबीआयची टीम सकाळी सात वाजता त्यांच्या घरात दाखल झाली होती. सीबीआयने एकूण 16 ठिकाणी छापा टाकला. मात्र सीबीआयने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. INX मीडियाला दिलेल्या मंजुरीबाबत ही छापेमारी करण्यात आली आहे. पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर INX कंपनीला झुकतं माप देऊन लाच घेतल्याचा आरोप आहे. मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले पीटर मुखर्जी हे INX मीडियाचे प्रमुख आहेत. INX मीडियाशी संबंधित प्रकरणात सोमवारीच गुन्हा दाखल झाला होता. Chidambaram_Raid या प्रकरणात छापा! हे प्रकरण आयएनएक्स मीडियाशी संबंधित आहे. INX मीडियाच्या निधीला FIPB द्वारे मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी पी. चिदंबरम त्या विभागाचे मंत्री होते. सीबीआयने या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल केला होता, ज्यात इंद्राणी मुखर्जी, पीट मुखर्जी आणि कार्ती मुखर्जी यांच्या नावाचा समावेश होता. चेन्नईत पी. चिदंबरम यांच्या घरासह कार्यालयातही सीबीआयने छापा टाकला. सीबीआय दिल्लीतही छापा टाकू शकते असं सांगितलं जात आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात या प्रकरणाचा तपास थांबला होता, जो आता पुन्हा सुरु करण्यात आला. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयचा छापा असे ट्रान्सफर झाले पैसे आणि शेअर सुत्रांच्या माहितीनुसार, 2008 मध्ये पीटर मुखर्जी यांची कंपनी आयएनएक्स मीडियाने, कार्ती चिदंबरम यांना पैसे दिले होते. त्यांची कंपनी अॅडवान्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांना शेअर दिले होते. आयएनएक्स मीडियाने हफ्त्याने रोख रक्कम दिली होती. या दरम्यान 60 लाख शेअर लंडनमधील आर्टेव्हिया डिजिटल यूके लिमिटेड कंपनीकडून कार्ती चिदंबरम यांच्या कंपनीत ट्रान्सफर करण्यात आले होते. जप्त हार्डडिस्कमुळे खुलासा याआदी आयकर विभागाने छाप्यादरम्यान कार्ती चिदंबरम यांच्या कंपनीची हार्डडिस्क जप्त केली होती. आयएनएक्स मीडियाकडून कार्ती यांच्या कंपनीना पैसे मिळाल्याचा खुलासा झाला होता. यासंबंधित कागदपत्रं एफआयपीबीकडे मंजुरीसाठी आले, त्यादरम्यान पी चिदंबरम अर्थमंत्री होते, असंही यातून समोर आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget