एक्स्प्लोर

बोफोर्स प्रकरण : 13 वर्षांनंतर सीबीआयला जाग, सुप्रीम कोर्टात अपिल

1986-87 मध्ये राजीव गांधी सरकारने स्वीडनमधील एबी बोफोर्स कंपनीकडून 1474 कोटी रुपयांमध्ये 400 तोफा खरेदी केल्या होत्या.

नवी दिल्ली : बोफोर्स प्रकरणी तब्बल 13 वर्षांनंतर सीबीआयला जाग आली आहे. 2005 साली बोफोर्स प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात सीबीआयने आता सुप्रीम कोर्टात अपिल केले आहे. 2005 मध्ये दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यास विलंब झाला होता. या विलंबाला सीबीआयने तत्कालीन सरकारला जबाबदार धरले आहे. 2005 मध्ये दिल्ली हायकोर्टाने हिंदुजा बंधू आणि एबी बोफोर्स कंपनीविरोधातील प्रकरण बंद केले होते. सीबीआयच्या मते, हा निर्णय चुकीचा होता. शिवाय त्यावेळी सीबीआय दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत होती. मात्र तत्कालीन केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यास मान्यता दिली नाही. सीबीआयच्या मते, तत्कालीन सरकारने राष्ट्रीय हिताच्या विरोधात निर्णय घेतला. त्यामुळे बोफोर्समधील आरोपींना कायद्याच्या तावडीतून मोकळे होताना पाहावं लागलं. 69 पानांच्या अपिलमध्ये सीबीआयने डिटेक्टिव्ह फर्म फेअरफॅक्सचे अध्यक्ष मायकल हर्शमॅन यांच्या मुलाखतीचा हवाला दिला आहे. गेल्या वर्षी हर्शमॅन यांनी म्हटले  होते की, बोफोर्स व्यवहारात भ्रष्टाचारप्रकरणी मजबूत पुरावे आहेत. नव्या पुराव्यांच्या आधारे बोफोर्स प्रकरणाची आणखी चौकशीची गरज आहे, असे अपिलमध्ये सीबीआयने म्हटले आहे. मात्र 2005 मध्ये दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार बोफोर्स प्रकरणाची आणखी चौकशी शक्य नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणीही सीबीआयने केली आहे. 1986-87 मध्ये राजीव गांधी सरकारने स्वीडनमधील एबी बोफोर्स कंपनीकडून 1474 कोटी रुपयांच्या 400 तोफा खरेदी केल्या होत्या. यावेळी, सरकारमधील उच्चपदस्थांना एबी बोफोर्सने 64 कोटी रुपयांचं कमिशन दिल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात कमकुवत चौकशीचा फायदा घेत एक एक करुन आरोपी सुटत गेले. 2005 मध्ये दिल्ली हायकोर्टाने हिंदूजा बंधूंचीही सुटका केली. दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात त्यावेळी अपिल केले नाही. या प्रकरणात वकील अजय अग्रवाल यांची याचिका मात्र प्रलंबित आहे. मात्र, 16 जानेवारीला सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केला की, जर तपास यंत्रणेने अपिल केलं नाही, मग इतरांच्या अपिलवर सुनावणी कशी होईल? आता सीबीआयने बोफोर्स प्रकरणात नव्या पुराव्यांचा दावा केला असून, 13 वर्षांनंतर अपिल दाखल केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Drone Didi Yojana : 'ड्रोन दीदी' बनण्यासाठी अर्ज कसा करायचा? कोणत्या महिलांना फायदा मिळणार? जाणून घ्या पात्रता आणि योजनेबद्दल सर्वकाही
'ड्रोन दीदी' बनण्यासाठी अर्ज कसा करायचा? कोणत्या महिलांना फायदा मिळणार? जाणून घ्या पात्रता आणि योजनेबद्दल सर्वकाही
Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधान अखेर शिक्षण मंत्र्यांच्या खुर्चीवरून पायउतार; राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्र्याला किती पेन्शन मिळते? A टू Z माहिती
धर्मेंद्र प्रधान अखेर शिक्षण मंत्र्यांच्या खुर्चीवरून पायउतार; राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्र्याला किती पेन्शन मिळते? A टू Z माहिती
Dharmendra Pradhan Resign: धर्मेंद्र प्रधान स्वतःच दोनदा राजीनामा देण्यासाठी गेले? सरकारने मंजूर केला नाही, इनसाईड स्टोरी समोर
धर्मेंद्र प्रधान स्वतःच दोनदा राजीनामा देण्यासाठी गेले? सरकारने मंजूर केला नाही, इनसाईड स्टोरी समोर
Shrikant Shinde and Education Minister: केंद्रीय शिक्षणमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा, शिंदे सेनेचा नेता म्हणाला, 'मोदी जी जबाबदारी...'
केंद्रीय शिक्षणमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा, शिंदे सेनेचा नेता म्हणाला, 'मोदी जी जबाबदारी...'

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Embed widget